Iran’s Attack: इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेची तयारी, बायडन प्रशासनाने इस्रायलला पाठवले वरिष्ठ लष्करी कमांडर

इराणकडून हल्ला झाल्यास बायडेन प्रशासन इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

149
Iran's Attack: इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेची तयारी, बायडन प्रशासनाने इस्रायलला पाठवले वरिष्ठ लष्करी कमांडर

इराणच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका तयार आहे. इराणी हल्ल्याच्या वाढत्या भीतीमुळे बायडेन प्रशासनाने गुरुवारी अचानक अमेरिकेच्या एका वरिष्ठ लष्करी कमांडरला इस्रायलला पाठवले. याविषयी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायलला पाठवण्यात आलेल्या लष्करी कमांडरने (military commander ) इराणला (Iran) प्रत्युत्तर देण्यासाठी एका समान धोरणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

इस्रायलनेही सैन्याला केले सतर्क
न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. इराणने सिरियातील १ एप्रिलच्या हल्ल्याबाबत इस्रायलवर कारवाई करणार असल्याचे वारंवार म्हटले आहे, असे अहवालात म्हटले आहे. या हल्ल्यात अनेक वरिष्ठ इराणी कमांडर मारले गेले. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी इराणच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. इस्रायलनेही आपल्या सैन्याला सतर्क केले आहे.

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान मोदी शुक्रवारी राजस्थान आणि जम्मू-काश्मीर दौऱ्यावर; जाहीर सभा, रोड शोचे आयोजन)

बायडेन प्रशासन इस्रायलच्या पाठीशी खंबीर
इराणकडून हल्ला झाल्यास बायडेन प्रशासन इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, इराणला शांत करण्यासाठी अमेरिकेने चीन आणि इजिप्तसारख्या देशांशीही चर्चा केली आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि इराणने त्यांच्या देशावर हल्ला केल्यास त्यांची कारवाई सहन केली जाणार नसून त्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल, असे सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.