Salil Chowdhury : आधी केला अपमान, नंतर अमेरिकन लोक सलील चौधरींच्या प्रेमात पडले

दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, न जाने क्यों, कही दूर जब दिन ढल जाए ही गाणी कानावर पडली की त्या महान कलाकाराला प्रणाम करावासा वाटतो.

8
Salil Chowdhury : आधी केला अपमान, नंतर अमेरिकन लोक सलील चौधरींच्या प्रेमात पडले
Salil Chowdhury : आधी केला अपमान, नंतर अमेरिकन लोक सलील चौधरींच्या प्रेमात पडले

दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, न जाने क्यों, कही दूर जब दिन ढल जाए ही गाणी कानावर पडली की त्या महान कलाकाराला प्रणाम करावासा वाटतो. त्यांचं नाव संगीतकार सलील चौधरी. त्यांनी प्रामुख्याने बंगाली, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांना संगीत दिले. चित्रपटसृष्टीत ‘सलील दा’ नावाने प्रसिद्ध असलेले सलील चौधरी हे अत्यंत प्रयोगशील आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून ओळखले जातात. (Salil Chowdhury)

सलील चौधरी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२३ रोजी पश्चिम बंगालमधील सोनारपूर शहरात झाला. त्यांचे वडील ज्ञानेंद्र चंद्र चौधरी आसाममध्ये डॉक्टर होते. सलील चौधरी यांचे बालपण आसाममध्ये गेले. लहानपणापासूनच त्यांचा संगीताकडे कल होता आणि त्यांना संगीतकार व्हायचे होते. जरी त्यांनी पारंपारिक संगीताचे शिक्षण कोणत्याही गुरूकडून घेतले नसले तरी त्यांनी सदाबहार संगीत निर्माण केले आहे. सलील चौधरी यांचा मोठा भाऊ ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचा. त्यांच्या सहवासामुळे सलीलजींना सर्व प्रकारच्या वाद्यसंगीताची चांगली ओळख झाली. (Salil Chowdhury)

‘सलील दा’ यांना लहानपणापासूनच बासरी वाजवण्याची खूप आवड होती. याशिवाय ते पियानो आणि व्हायोलिन वाजवायला शिकले. काही काळानंतर ते शिक्षणासाठी बंगालमध्ये आले. सलील चौधरी यांनी कोलकाता येथील प्रसिद्ध ‘बंगवासी कॉलेज’मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सविता चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आणि दोन मुलं झाली. सलील चौधरी आजही ‘मधुमती’, ‘दो बिघा जमीन’, ‘आनंद’, ‘मेरे अपने’ सारख्या चित्रपटांच्या सुमधुर संगीतातून लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात. पारंपारिक संगीतापेक्षा अगदी वेगळे असलेले पूर्व आणि पश्चिमेतील संगीत एकत्र करून ते संगीत तयार करायचे. (Salil Chowdhury)

एकदा सलील चौधरी अगदी तरुण असताना अमेरिकेत (लॉस एंजेलिस) गेले होते. तिथे एका मोठ्या म्युझिक इंस्ट्रुमेंट दुकानात गेले असताना त्यांच्याकडे सुरुवातील कुणीच लक्ष दिले नाही. कारण ते अतिशय सामान्य कपडे घालून गेले होते. थोड्या वेळाने तिथे क्रिस्टिना नावाची सेल्सगर्ल आली आणि सलील यांना काय पाहिजे ते विचारु लागली. मात्र तिला सलीलदांशी मनापासून बोलायचं नव्हतं. ती केवळ औपचारिकता करत होती. (Salil Chowdhury)

(हेही वाचा – Amitabh Bachchan : जाणून घ्या महानायक बिग बी यांच्या बद्दलच्या काही खास गोष्टी)

सलीलदांनी वर असलेले सितार काढायला सांगितलं. त्यावर त्या मुलीने नकार दिला. तिने दुसर्‍या गोष्टी पाहायला सांगितल्या. तेव्हा तिथे दुकानाचा मालक डेव्हिड आला आणि त्याने क्रिस्टिनाचं बोलणं ऐकून घेतलं. क्रिस्टिना म्हणाली की, “ह्यांना बॉस सितार हवी आहे आणि ह्यांना ती वाजवता येणार नाही.” त्यावर सलीलदा म्हणाले की “तुमच्याकडे बॉस सितार म्हणतात तर आमच्याकडे सदाबहार सितार म्हणतात.” थोड्या वेळाने सलीलदांनी सितार वाजवली आणि सगळेच मंत्रमुग्ध झाले. क्रिस्टिनाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तिने एक नोट काढली आणि सलीलदांना त्यावर काहीतरी लिहायला सांगितले. सलीलदांनी आपलं नाव त्या नोटेवर लिहिलं. तर डेव्हिडने त्यांचं अभिनंदन केलं आणि क्षमा मागितली व सितार त्यांना भेट म्हणून दिली. (Salil Chowdhury)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.