Amitabh Bachchan : जाणून घ्या महानायक बिग बी यांच्या बद्दलच्या काही खास गोष्टी

67
Amitabh Bachchan : जाणून घ्या महानायक बिग बी यांच्या बद्दलच्या काही खास गोष्टी

बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या (Amitabh Bachchan) अमिताभ बच्चन आपल्या ८१ व्या वर्षातही चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टीवर राज्य करत आहेत. बिग बी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. ७० ते ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ यांनी सिनेसृष्टीत पदार्पण करण्याच्या काळात ‘भुवन शॉ’, ‘सात हिंदुस्तानी’ हे चित्रपट केले. हे त्यांच्या कारकिर्दीतील अगदी सुरुवातीचे चित्रपट होते.

आज आपण त्यांची पहिली कमाई, त्यांच्याकडे असणाऱ्या महागड्या गाड्या, त्यांच्या लाईफस्टाइल बद्दल जाणून घेणार आहोत.

बिग बी यांना त्यांच्या पहिल्या कामासाठी मिळाले इतके पैसे

वयाच्या ८१ व्या वर्षीही महानायक (Amitabh Bachchan) अफलातून अभिनय करताना दिसतात. सध्या ते एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन आकारतात. मात्र त्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन घेतले होते तुम्हाला माहित आहे का? कोट्यवधी रूपयांची कमाई करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांनी पहिल्या चित्रपटासाठी केवळ पाच हजार रूपये मानधन घेतले होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वतः याबद्दल खुलासा केला होता.‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून अमिताभ यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अमिताभ यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. केवळ पाच हजार रुपये मानधन घेणाऱ्या अमिताभ बच्चन यांची आज तब्बल ३,१९० कोटींची नेटवर्थ आहे.

भारतातील सर्वात महागडे घर

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘जलसा’ आणि ‘प्रतीक्षा’ या बंगल्यांची किंमत आज २०० कोटींपेक्षा जास्त आहे. जलसा हे अमिताभ बच्चन यांचे घर दोन दशकांहून अधिक काळापासून बच्चन कुटुंबाचे घर राहिले आहे. भारतातील सर्वात महागड्या घरांपैकी हे एक घर आहे.

अमिताभ बच्चन यांना आहे या गोष्टींचा छंद

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना अभिनयाप्रमाणेच महागड्या गाड्यांचे कलेक्शन करण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वांत आलिशान गाड्यांपैकी एक असलेली ‘रोल्स रॉयस’ आहे. त्याच्याकडे रोल्स रॉयस फॅंटम-7 आहे. यामध्ये 6.75 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बेंटले कॉन्टिनेंटल, मर्सिडीज-बेंझ S-CLass, लेक्सस LX570, मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, फोर्ड प्रीफेक्ट, Mini Cooper, टोयोटा केमरी हायब्रिड आणि लँड क्रूझर या महागड्या गाड्या आहेत.

New Project 2023 11 02T140432.678

(हेही वाचा – Happy Birthday ऐश्वर्या ! मॉडेलिंग आणि अभिनयाचा यशस्वी प्रवास…वाचा सविस्तर)

या सवयीमुळे अमिताभ बच्चन राहतात एकदम फिट
सकाळी नियमित चालणे

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) रोज सकाळी लवकर उठतात आणि नियमित वर्कआऊट करतात. याशिवाय सकाळी न चुकता जिममध्ये जातात आणि २० मिनिट्स किमान चालण्याचा व्यायाम करतात. ब्लड सर्क्युलेशन उत्तम राहावे यासाठी ते कधीही व्यायाम चुकवत नाही. यामुळेच दिवसभर त्यांची एनर्जी उत्तम राहाते.

९ तासांची झोप

एका मुलाखतीत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी स्वतः स्पष्ट केल्यानुसार, ते पूर्ण ९ तासांची झोप घेतात. तसंच रात्र लवकर झोपण्याची त्यांना सवय आहे. यामुळेच त्यांचे आरोग्य अधिक चांगले राखले जाते.

धुम्रपान आणि मद्यपानापासून दूर

चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना धुम्रपान करताना दाखवलं असलं तरीही खऱ्या आयुष्यात मात्र धुम्रपानापासून ते दूर राहतात. याशिवाय कधीही ते अल्कोहोलचे सेवन देखील करत नाहीत. तसेच चहा अथवा कॉफीचेदेखील ते सेवन करत नाहीत.

गोड पदार्थ वर्ज्य

फिटनेस राखण्यासाठी मिठाईपासूनही अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) दूर राहतात असे एका रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आले आहे. केक, पेस्ट्री तसंच कोणत्याही भारतीय मिठाईचे सेवन अमिताभ बच्चन यांनी बरेच वर्ष केलेले नाही. हे एखाद्याला खोटं वाटू शकतं, मात्र चांगल्या आरोग्यासाठी हा नियम त्यांनी कायम पाळला आहे.

शुद्ध शाकाहारचे सेवन

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) तरूणपणी मांसाहार करत होते, मात्र आता शुद्ध शाकाहारी झाले असून संतुलित डाएट रूटिनचा त्यांनी आधार घेतला आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या डाएटमध्ये नारळ पाणी, तुळशीची पाने, प्रोटीन ड्रिंक्स, आवळा, पनीर बुरजी, पालक, सूप, सलाड या सगळ्याचा समावेश करून घेतला आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच चौदा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांच्या नावे आहेत. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही अमिताभ बच्चन काम करतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.