Happy Birthday ऐश्वर्या ! मॉडेलिंग आणि अभिनयाचा यशस्वी प्रवास…वाचा सविस्तर

ऐश्वर्या राय बच्चनने मिस वर्ल्ड १९९४ जिंकून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.

23
Happy Birthday ऐश्वर्या ! मॉडेलिंग आणि अभिनयाचा यशस्वी प्रवास...वाचा सविस्तर
Happy Birthday ऐश्वर्या ! मॉडेलिंग आणि अभिनयाचा यशस्वी प्रवास...वाचा सविस्तर

ऐश्वर्या राय-बच्चनला (Aishwarya Rai-Bachchan) कुणी ओळखत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि महानायक अमिताभ बच्चन यांची सून अशी तिची ओळख. ऐश्वर्या रायचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ साली बंगळुरु येथे झाला. तिचे वडील कृष्णराज राय भारतीय सेनेत जीवशास्त्रज्ञ होते आणि तिची आई वृंदा राय एक गृहिणी आहे. तिला एक भाऊसुद्धा आहे, ज्याचं नाव आदित्य राय असून तो मर्चंट नेव्हीमध्ये इंजिनियर या पदावर कार्यरत आहे.

ऐश्वर्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. ऐश्वर्याचं सुरुवातीचं शिक्षण आर्य विद्या मंदिर हायस्कूलमध्ये झालं. पुढे जय हिंद कॉलेजमध्ये एक वर्ष इंटरमिडियटचं शिक्षण घेतलं आणि मग माटुंगा येथील डीजी रुपारेल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. विशेष म्हणजे ती ९० टक्क्याने उत्तीर्ण झाली.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ऐश्वर्या रायला वास्तुविशारद व्हायचे होते. म्हणून तिने रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये ऍडमिशन घेतलं, मात्र नंतर तिचा कल मॉडेलिंगकडे वळला आणि तिला हे शिक्षण सोडावं लागलं. तिचा मॉडेलिंग आणि अभिनयाचा यशस्वी प्रवास सुरू झाला, मात्र राजीव मूलचंदानी, सलमान खान आणि विवेक ऑबेराय (Rajeev Moolchandani, Salman Khan and Vivek Oberoi) यांच्या सोबत असलेल्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र रंगल्या.

(हेही वाचा – Apple Momento : दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला ॲपल कंपनीने दिला अनोखा मोमेंटो )

तामिळ चित्रपट ‘इरुवर’ आणि हिंदी चित्रपट ‘और प्यार हो गया’ यासारख्या चित्रपटांमधून तिने पदार्पण केलं आणि मग तिने मागे वळून पाहिलं नाही. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मोहब्बते’, ‘मेला’, ‘देवदास’, ‘धूम २’ अशा चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. ऐश्वर्या राय बच्चनने मिस वर्ल्ड १९९४ जिंकून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. तिच्या कारकिर्दीच्या सक्रीय वर्षामध्ये ती सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून प्रचलित होती. विशेष म्हणजे तिने ५ वर्षे शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. २००४ मध्ये टाईम मॅगझिनने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून तिची निवड केली. तिचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती एकमेव अभिनेत्री आहे, जी पेप्सी आणि कोका कोला या दोन्ही जाहिरातींमध्ये झळकली.

२० एप्रिल २००७ मध्ये ती अभिनेता अभिषेक बच्चनसोबत विवाह बंधनात अडकली. महानायक अमिताभ बच्चन तिचे सासरे असून ‘गुड्डी’ म्हणून प्रचलित असलेल्या अभिनेत्री जया बच्चन तिची सासू आहे. तिला आराध्या नावाची गोड मुलगी आहे. जिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.