Lifestyle: पाण्याची बाटली आणि थर्मासला आतून दुर्गंध येतो? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय…

11
Lifestyle: पाण्याची बाटली आणि थर्मासला आतून दुर्गंध येतो? करा 'हे' सोपे घरगुती उपाय...
Lifestyle: पाण्याची बाटली आणि थर्मासला आतून दुर्गंध येतो? करा 'हे' सोपे घरगुती उपाय...

थर्मास किंवा पाण्याच्या बाटलीमध्ये असणाऱ्या व्हॅक्युम सीलमुळे वाफ बाहेर येत नाही आणि पेय जास्त वेळ गरम राहू शकते. त्यामुळे चहा, दूध, गरमपाठी इत्यादी पेय पदार्थ यामध्ये साठवता येतात. हल्ली बरेज जण या वस्तूंचा वापर करतात, पण या बाटल्या साफ कशा करायच्या हे अनेक जणांना माहित नसते. काही जण चुकीच्या पद्धतीने थर्मास किंवा पाण्याची बाटली स्वच्छ करतात. त्यामुळे या वस्तू लवकर खराब होऊ शकतात. जाणून घेऊया, या थर्मास किंवा पाण्याची बाटली स्वच्छ करण्याची योग्य पद्धत. यामुळे बाटलीतील विषाणू नष्ट व्हायला मदत होईल. (Lifestyle)

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
थर्मासमद्ये अर्धा कप व्हिनेगर घाला आणि त्यावर १ चमचा बेकिंग सोडा शिंपडा. नंतर त्यात थोडे गरम पाणी घालून १० मिनिटे राहू द्या. थर्मासच्या आतील भाग पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी ब्रशने आतील बाजूस हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे बाटली दुर्गंधीमुक्त होईल.

बर्फ आणि मीठ
थर्मासमध्ये २सी सॉल्टसह बारीक केलेला बर्फ घाला. त्यानंतर थर्मासचे झाकण बंद करा आणि थर्मास व्यवस्थित हलवा. नंतर थर्मासमध्ये गरम पाणी घाला. ब्रश किंवा सुती कापडाने घासून घ्या. या पद्धतीमुळे बाटली किंवा थर्मास आतून नवीन असल्यासारखे चमकू लागले.

(हेही वाचा – Poshan Pack: गरिबांच्या आरोग्यासाठी ‘पोषण पॅक’; ‘इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन’ संस्थेचा अभिनव उपक्रम )

गरम पाणी
बाटली अर्ध्या गरम पाण्याने भरा. त्यात लिक्विड डिश सोपचे द्रावण टाका. हे द्रावण तयार करण्यासाठी एका भांड्यात थोडे कोमट पाणी घ्या आणि त्यात लिक्विड सोपचे काही थेंब टाका आणि मिसळा. यानंतर थर्मासची बाटली काही वेळ उघडी ठेवा. त्यानंतर बाटली गरम पाण्याने स्वच्छ करा.

लिंबू
लिंबाच्या सुगंधामुळे बाटलीला येणारा दुर्गंध निघून जायला मदत होईल. यासाठी बाटली लिंबाच आणि कोमट पाण्याने भरून ठेवा. काही वेळ हे मिश्रण बाटलीत तसेच राहू द्या. आता लिंबाच्या सालीमध्ये थोडे मीठ घेऊन बाटलीचे तोंड स्वच्छ करा. मीठ आणि लिंबामुळे बाटलीतील जंतू नष्ट व्हायला मदत होईल.

‘ही’ चुका टाळा…
– थर्मास स्वच्छ करण्यासाठी क्लोरिन किंवा ब्लीच वापरू नका. थर्मासच्या आत असणारा स्टेनलेस स्टीलचा भाग खराब होऊ शकतो तसेच थर्मास स्वच्छ करण्यासाठी अत्यंत गरम किंवा उकळत्या पाण्याचा वापर करू नका, कारण यामुळे थर्मासचा पेंट किंवा बाहेरील भागाला हानी पोहोचू शकते. आणि व्हॅक्युम सीलदेखील तुटू शकते. यामुळे पेय पदार्थ जास्त वेळ गरम राहू शकत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.