Indian Railways : भारतीय रेल्वेने एका नियमामुळे कमावले २८०० कोटी; काय आहे तो नियम?

75
Indian Railways : भारतीय रेल्वेने एका नियमामुळे कमावले २८०० कोटी; काय आहे तो नियम?

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्सकडे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार (Indian Railways) भारतीय रेल्वेने केवळ एक नियम बदलून तब्बल २८०० कोटींची कमाई केली आहे. २०१६ मध्ये केलेल्या नियम बदलामुळे रेल्वेला २८०० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. रेल्वेने यामधील ५६० कोटी केवळ २०२२-२३ या आर्थिक वर्षातच कमावले आहेत.

भारतीय रेल्वेने बदलला हा नियम

सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मध्ये लहान मुलांच्या प्रवास भाड्यासंबंधी रेल्वे विभागाने (Indian Railways) आपल्या नियमात बदल केला होता. त्यानुसार, भारतीय रेल्वेने एका निश्चित वयाच्या मुलांसाठी तिकीट दर आकारण्यास सुरुवात केली. यामुळे रेल्वेला यामाध्यमातून तब्बल २८०० कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई करता आलेली आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : “काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड”; मध्य प्रदेशमधून मोदींचा काँग्रेसवर घणाघात)

२०१६ मध्ये रेल्वे मंत्रालयाने (Indian Railways) याविषयीची घोषणा केली होती. त्यानुसार, ५ वर्ष आणि १२ वर्षांच्या मुलांसाठी रिझर्व्ह कोचमध्ये वेगळ्या बर्थसाठी पूर्ण भाडे घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे खात्याने हा नियम २१ एप्रिल २०१६ रोजीपासून अंमलात आणला. त्यानंतर माहिती अधिकारात या बदललेल्या नियामातून किती नफा झाला याची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार गेल्या ७ वर्षात रेल्वेने २८०० कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.