J. P. Nadda : रमेश बिधुरी यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट

65
J. P. Nadda : रमेश बिधुरी यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट
J. P. Nadda : रमेश बिधुरी यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट

भारतीय जनता पक्षाचे खासदार रमेश बिधुडी यांनी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. बसपचे खासदार दानिश अली यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे पक्षाने बिधुडी यांना आपली बाजू स्पष्ट करण्यास सांगितले होते. दक्षिण दिल्लीतून भाजपचे खासदार रमेश बिधुरी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन नुकतेच बाहेर आले आहेत.

दानिश अली प्रकरणात त्यांनी आपली बाजू नड्डा यांच्यापुढे मांडली असल्याचे समजते. संसदेच्या विशेष अधिवेशनात रमेश बिधुरी यांनी बसपचे खासदार दानिश अली यांच्याप्रती आक्षेपार्ह शब्दांचा उपयोग केला होता. यामुळे बिधुडी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विरोधी पक्षांनी हा मुद्या रेटून लावला आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification : आमदार अपात्रतेसंबंधी 13 ऑक्टोबरला होणार सुनावणी)

विशेष म्हणजे, खासदार दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे रमेश बिधुरी यांची लेखी तक्रार केली आहे. तर दुसरीकडे, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दानिश अली यांच्यावर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्या दिवशीची घटना लोकांपुढे मांडली आहे. दुबे यांनी सांगितले की, बिधुरी सभागृहात बोलत असताना दानिश अली वारंवार टोमणेबाजी करीत होते.

एवढेच नव्हे तर, पंतप्रधान मोदी यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य सुध्दा केले होते. मुळात, घडलेल्या प्रकाराला दानिश अली हेच दोषी आहेत. कारण, बिधुरी यांना ते जाणीवपूर्वक उकसवत होते, असे दुबे यांनी म्हटले आहे. यासाठी दुबे यांनी ओम बिर्ला यांना पत्र लिहून समिती स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय दानिश अलीने केलेल्या कमेंटवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.