Indian Football Team : २०२४ मध्ये या भारतीय फुटबॉलपटूंवर लक्ष हवंच

भारतीय संघातील उगवते ५ फुटबॉलपटू कुठले आहेत जाणून घेऊया. 

148
Indian Football Team : २०२४ मध्ये या भारतीय फुटबॉलपटूंवर लक्ष हवंच
  • ऋजुता लुकतुके

अलीकडेच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने ११७ वं स्थान मिळवून गेल्या १७ वर्षातील आपली सगळ्या खराब कामगिरी नोंदवली आहे. आणि त्यामुळेच कदाचित चर्चा होतेय ती फुटबॉल संघातील आवश्यक बदलांची आणि स्थित्यंतराची. जुने खेळाडू जाऊन १७ वर्षांखालील गटात जागतिक स्तरावर चमकलेले खेळाडू राष्ट्रीय स्तरावर कधी चमकतील असा प्रश्न फुटबॉल रसिकांसमोर आहेत. खरंतर या खेळाडूंची झलक जानेवारीत पार पडलेल्या कलिंगा चषकात आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया. भारतीय फुटबॉलचे भविष्यातील ५ उगवते तारे. (Indian Football Team)

आयझॅक राल्टे (ओडिशा एफसी)

ओडिशा एफसीकडून खेळणारा आयझॅक त्याच्या कमी उंचीमुळे पॉकेट रॉकेट म्हणून ओळखला जातो. पण, २३ वर्षांचा आयझॅक मैदानावर पळायला लागला काही काही क्षणातच मैलांचं अंतर कापतो. मिडफिल्डर म्हणून राष्ट्रीय संघात तो नावारुपाला आला आहे. इंडियन सॉकर लीगमध्ये सध्या तोच सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. आणि यंदा हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याने २ गोल करण्याबरोबरच २ गोल करण्यासाठी मदतही केली आहे. (Indian Football Team)

(हेही वाचा – Borivali Crime : ११ वर्षीय मुलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न; बोरीवलीतील धक्कादायक घटना)

लालियन छांगटे

सुनील छेत्रीनंतर भारतीय फुटबॉल संघाची धुरा कोण वाहणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इंडियन सॉकर लीग त्याने गाजवलीय. आणि गेल्या हंगामात मुंबई एफसीकडून तब्बल १० गोल केलेत. आयएसएलच्या मागच्या ९ हंगामांमध्ये फक्त दोनच भारतीयांनी हंगामातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान मिळवला. सुनील छेत्री आणि दुसरा लालियनझुला. वेग आणि प्रतिस्पर्ध्यांना चकवण्याची कला त्याच्याकडे होतीच. आता गेल्या काही वर्षांत त्याने गोल करण्याची हातोटीही मिळवली आहे. (Indian Football Team)

अन्वर अली

अन्वर अलीला २०१९ मध्ये विचित्र ह्रदयरोगाने ग्रासलं होतं. पण, जिद्दीने तो त्यातून बाहेर पडला. फुटबॉलच्या मैदानात त्याने पुनरागमन केलं. आणि मोहन बागानला त्याने आयएसएल लीग जिंकूनही दिली. बचाव फळीतील हा महत्त्वाचा खेळाडू आहे. आणि मागे राहून आक्रमक चाली रचण्यासाठी प्रसिद्ध आहे. मैदानात हमखास चांगली कामगिरी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. ड्युरांड चषकात १० खेळाडूंसह खेळणाऱ्या मोहनबागानवर त्याने एकही गोल होऊ दिला नव्हता. (Indian Football Team)

(हेही वाचा – CRIME: आमदार महेश लांडगेंचा इशारा अन् १० दिवसांत घरावर बुलडोझर, आरोपी नौशाद शेखला अटक)

नोरम महेश सिंग

ईस्ट बंगालच्या संघाला पडलेलं हे सुरेख स्वप्न आहे असं महेशच्या बाबतीत बोललं जातं. मैदानावर सध्या ईस्ट बंगालचा संघ चाचपडत असला तरी महेशने खेळात कसूर केलेली नाही. खरंतर तो उजव्या किंवा डाव्या बगलेतून आक्रमण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण, गरज पडल्यास तो मिडफिल्डरचं कामही नीट पाहतो. (Indian Football Team)

शिवशक्ती नारायणन

बंगळुरी एफसीकडून खेळणारा शिवशक्ती हा संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. छेत्री आणि कृष्णन यांच्या छायेत वावरणारा शिवशक्ती दोघांपेक्षा चांगली कामगिरी कधी करायला लागला हे समजलंही नाही. गेल्या हंगामात या दोघांना मागे टाकत त्याने ६ गोल केले होते. आघाडीच्या फळीतील हा भिस्त ठेवता येईल असा खेळाडू आहे. (Indian Football Team)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.