Borivali Crime : ११ वर्षीय मुलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न; बोरीवलीतील धक्कादायक घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरिवली पूर्व कुलूप वाडी या ठिकाणी एका उच्चभ्रू इमारतीत भाडेतत्वावर ११ वर्षाची मृत मुलगी तीची ४६ वर्षीय आई ३६ वर्षीय वडीलासोबत राहण्यास होती. वडिलांचे परिसरातच मेन्स पार्लर आणि टॅटू शॉप आहे, मुलीचे वडील टॅटू आर्टिस्ट असून आणि मेकअप आर्टिस्ट होती.

267
Borivali Crime : ११ वर्षीय मुलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न; बोरीवलीतील धक्कादायक घटना
Borivali Crime : ११ वर्षीय मुलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न; बोरीवलीतील धक्कादायक घटना

बोरिवली (Borivali Crime) पूर्व येथील कुलूप वाडी येथे शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. ४६ वर्षीय मातेने पोटच्या ११ वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर स्वतःच्या मनगटाची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी मातेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी मातेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या आईवर मानसिक उपचार सुरू होते, मानसिक आजारातून तीने हे कृत्य केले असावे अशी शक्यता वर्तवली आहे. (Borivali Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरिवली (Borivali Crime) पूर्व कुलूप वाडी या ठिकाणी एका उच्चभ्रू इमारतीत भाडेतत्वावर ११ वर्षाची मृत मुलगी तीची ४६ वर्षीय आई ३६ वर्षीय वडीलासोबत राहण्यास होती. वडिलांचे परिसरातच मेन्स पार्लर आणि टॅटू शॉप आहे, मुलीचे वडील टॅटू आर्टिस्ट असून आणि मेकअप आर्टिस्ट होती. मृत मुलीच्या आईवर मागील काही महिन्यांपासून मानसिक उपचार सुरू होते. परंतु ती स्वतःला मानसिक रुग्ण समजत नव्हती, व गेल्या काही दिवसापासून तीने मानसिक आजारावरील औषध घेणे देखील बंद केले होते. गुरुवारी रात्री पतीने तीला औषध घेण्यासाठी खूप विनंती केली, त्यानंतर मुलीने आईला औषध घेण्यासाठी विनंती करून देखील ती औषध घेत नव्हती. काही वेळाने आई बेडरूममध्ये गेली असता मुलगी औषधे घेऊन बेडरूममध्ये गेली, आईने बेडरूमचे दार आतून बंद करून घेतले, काही वेळाने बेडरूममधून ओरडण्याचा आवाज आला म्हणून पतीने बेडरूमकडे धाव घेतली, परंतु आतून दार बंद असल्यामुळे त्याने दार खोलण्यासाठी मुलीला आवाज दिला परंतु आतून काहीही आवाज न आल्यामुळे त्याने मोबाईलचा कॅमेरा सुरू केला. (Borivali Crime)

(हेही वाचा – Ram Mandir: रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी नवीन व्यवस्था लागू, काय आहेत नवीन नियम? वाचा सविस्तर…)

मोबाईलच्या कॅमेरामध्ये रक्ताचे डाग दिसल्यामुळे घाबरलेल्या पतीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेडरूमचे दार तोडून आत प्रवेश केला असता ११ वर्षाची मुलगी निपचित पडली होती व तिची आई रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तात्काळ दोघींना रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मुलीला तपासून मृत घोषित केले व आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याने मुलीच्या हत्येप्रकरणी आईवर हत्येचा गुन्हा दाखल केला केला आहे. मानसिक आजारातुन आईच्या हातून हे कृत्य घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. (Borivali Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.