Dilip Vengsarkar : भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकून देणारे भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर

दिलीप वेंगसरकर सध्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग सीझन ५ मधील तेलुगू वॉरियर संघाचे संघ मार्गदर्शक आणि प्रशिक्षक आहेत.

175
Dilip Vengsarkar : भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकून देणारे भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर

दिलीप बळवंत वेंगसरकर (Dilip Vengsarkar) हे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशासक आहेत. सुनील गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासोबत ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ८० च्या सुरुवातीच्या काळात ते भारतीय संघासाठी खेळले. ते प्रमुख फलंदाजांपैकी एक होते. विशेष म्हणजे १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात त्यांनी मोलाची कामगिरी केली होती. (Dilip Vengsarkar)

वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी १९७५-७६ मध्ये ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्ध सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ही कसोटी भारताने जिंकली. त्यानंतर ते तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु लागले. १९७८-७९ च्या भारतातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, त्यांनी कलकत्ता येथे सुनील गावस्कर यांच्यासोबत ३०० हून अधिक धावांची भागीदारी केली होती. विशेष म्हणजे गावस्करांसोबत वेंगसरकरांनी देखील शतक झळकावले. (Dilip Vengsarkar)

(हेही वाचा – IPL 2024 GT vs PBKS : युवराज सिंगचा १२ वर्षांचा विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा कोण आहे?)

वेंगसरकर यांनी यांच्याविरुद्ध झळकावली ६ शतके 

१९८५ ते १९८७ या काळात त्यांनी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यासारख्या दमदार टीम विरुद्ध शतके झळकावली आहेत. वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांविरोधात खूप कमी फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, त्यापैकी एक दिलीप वेंगसरकर होते. (Dilip Vengsarkar)

त्यांनी माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग आणि अँडी रॉबर्ट्स यांच्या विरुद्ध ६ शतके झळकावली आहेत. वेंगसरकर यांनी १९८८ च्या आशिया चषकात चॅम्पियन होण्यासाठी आपल्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले. ते (Dilip Vengsarkar) सध्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग सीझन ५ मधील तेलुगू वॉरियर संघाचे संघ मार्गदर्शक आणि प्रशिक्षक आहेत. (Dilip Vengsarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.