आता लवकरच भारतात मिळणार ई-पासपोर्ट, वाचा सविस्तर…

104

भारतात ई-पासपोर्ट प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालय (MEA) चीप आधारित नवीन पासपोर्ट जारी करण्याची तयारी करत आहे. परराष्ट्र व्यवहार, पासपोर्ट आणि व्हिसा व्यवहार मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता नव्याने बनवण्यात येणा-या पासपोर्टमध्ये पासपोर्टधारकाची माहिती इलेक्ट्रॉनिक चिपमध्ये सुरक्षितपणे साठवली जाणार आहे.

हे पासपोर्ट इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे बनवले जाणार आहेत. हे पासपोर्ट आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक मानकांनुसारच असणार आहेत. याद्वारे जगातील सर्व इमिग्रेशन पोस्टवरील हालचाली सुलभ होण्यास मदत होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे ई पासपोर्ट बनवताना डेटा सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. जर डेटामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला तर सिस्टम लगेच अलर्ट होईल.

सुरक्षेची हमी 

मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज नवीन ई-पासपोर्टमध्ये पासपोर्ट धारकाचा डेटा डिजिटल स्वाक्षरीसह चीपवर साठवण्यात येणार आहे. ही चीप पासपोर्टमध्ये एम्बेड केली जाईल. नवीन पासपोर्ट इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये तयार केला जात आहे.

( हेही वाचा :पंतप्रधानांच्या सुरक्षेत नक्की कुठे त्रुटी राहिली? जाणून घ्या माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची मते)

हा पासपोर्ट ICAO च्या मानकांवर असेल

गेल्या काही वर्षांत पासपोर्ट अर्ज आणि वाटपाच्या अनेक प्रक्रिया सोप्या आणि सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या भारतात ५०० हून अधिक पासपोर्ट केंद्रे कार्यरत आहेत. त्याचबरोबर देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्राची व्यवस्था सुनिश्चित करणे हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे ध्येय आहे. भारतातील सर्व 36 पासपोर्ट कार्यालये विद्यमान पासपोर्ट प्रणालीमध्ये सामील झाल्यानंतर ई-पासपोर्ट जारी करतील. ई-पासपोर्ट आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) मानकांवर आधारित असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.