IIT Bombay: JEE-Advance चा निकाल जाहीर, असा तपासा निकाल

126

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे तर्फे रविवारी आज संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2022) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी आपला निकाल तपासण्यासह स्कोअर कार्डही डाऊनलोड करू शकतात. जेईई ॲडव्हान्स्डचा निकाल जाणून घेण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लॉगइन करावे लागणार आहे. जेईई ॲडव्हान्स्डचा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लॉगइन करावे लागणार आहे. यासाठी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे.

(हेही वाचा – प्रभादेवीतील राड्यावर ‘मनसे’ची प्रतिक्रिया, म्हणाले “शिवसेनेने अडीच वर्षात जे…”)

उमेदवार लॉगिन क्रेडेंशियल्स, एप्लिकेशन नंबर, पासवर्ड वापरून जेईई ॲडव्हान्स्डची फायनर अन्सर की शीटदेखील अॅक्सेस करू शकतात. 26 ऑगस्ट रोजी झालेल्या जेईई ॲडव्हान्स्ड 2022 साठी 1.56 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

असा तपासा जेईई ॲडव्हान्स्डचा निकाल

  • जेईई ॲडव्हान्स्डचा निकाल पाहण्यासाठी jeeadv.ac.in अधिकृत वेबसाईटवर जावे
  • होम पेजवरील Announcements या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी निकालाची लिंक दिसेल
  • या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन क्रेडेन्शियल्स भरणे आवश्यक असणार आहे
  • लॉगिन क्रेडेन्शियल म्हणून, उमेदवारांना त्यांचा 7-अंकी रोल नंबर भरावा लागणार आहे. याशिवाय त्यांना जन्मतारीख आणि मोबाइल नंबर लागणार आहे
  • हे सर्व तपशील भरल्यानंतर, Get Result यावर क्लिक करा
  • यानंतर तुमचा जेईई ॲडव्हान्स्ड रिझल्ट पाहता येणार आहे. निकाल तपासून तो डाऊनलोडही करता येणार आहे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.