Holi Festival 2024 : सांस्कृतिक वैविध्याची शोभा वाढवणारी होळी!

भविष्यपुराणात होळी सणाचा उल्लेख आढळतो. अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे. वाईट प्रथा, सवयी, दुष्पप्रवृत्ती सोडून चांगल्या गोष्टींचा, मांगल्याचा स्वीकार करायला शिकवणारा सण, असे या सणाचे महत्त्व.

108
Holi Festival 2024 : सांस्कृतिक वैविध्याची शोभा वाढवणारी होळी!
  • नमिता वारणकर

मार्च महिन्यात वसंत ऋतुचे आगमन होते. नाविन्याची सुरुवात, रंगांची उधळण, प्रेमाचा सण असलेली ‘होळी’ आणि ‘धुलिवंदन’ हे भारतातील सर्वात प्राचीन सणही याच महिन्यात येतात. भविष्यपुराणात होळी सणाचा उल्लेख आढळतो. अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे. वाईट प्रथा, सवयी, दुष्पप्रवृत्ती सोडून चांगल्या गोष्टींचा, मांगल्याचा स्वीकार करायला शिकवणारा सण, असे या सणाचे महत्त्व. आपला देश विविधतेने नटलेला आहे. भाषा, पोषाख, संस्कृती, सणवार, उत्सव, चालीरिती… अशा सर्वच बाबतीत भारतात असलेली विविधता वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे सांस्कृतिक वैविध्याला शोभा देणारी होळी विविध देशांमध्ये कशी साजरी होते, देशाप्रमाणे तिचे बदलते स्वरुप, साजरा करण्याची पद्धत यामध्ये किती विविधता आहे… याचा या लेखाद्वारे घेतलेला मागोवा… (Holi Festival 2024)

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील बरसाना आणि नांदगाव या शहरांमध्ये अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. येथे स्त्रिया होळीच्या दिवशी काठ्या घेऊन पुरुषांच्या मागे लागतात. हे भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातील खेळकर नात्याचे प्रतीक मानले जाते. येथे अतिशय वेगळ्या पद्धतीने खेळला जाणारा हा सण पाहण्यासाठी पर्यटक खास आवर्जून येतात. (Holi Festival 2024)

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये होळी वसंतोत्सव म्हणून साजरा केला जातो. बंगालमधील रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतन या निवासस्थानी होळी उत्साहाने साजरी केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रम, मंत्रमुग्ध करणारे संगीत शिवाय प्रत्येकाच्या चेहऱ्याला अभीर लावून वसंतोत्सव साजरा केला जातो. (Holi Festival 2024)

(हेही वाचा – Indian Navy: सागरी क्षेत्रातील धोक्यांना तोंड देण्यासाठी भारतीय नौदलाने राबवली १०० दिवसांची मोहीम, वाचा सविस्तर…)

ओडिशा

डोल जत्रा किंवा डोल पौर्णिमा या नावाने ओडिशामध्ये होळी साजरी केली जाते. पंजाबमधील शीख समुदाय मार्शल आर्टस् प्रात्यक्षिके आणि होला मोहल्लादरम्यान कविता पठण करून होळी साजरी करतात. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या या परंपरेचा उद्देश शीख समुदायामध्ये शौर्य, धैर्य आणि एकता निर्माण करणे, हा आहे. (Holi Festival 2024)

गोवा, महाराष्ट्र

गोवा, महाराष्ट्रातील कोकणपट्ट्यात होळी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. गोव्याची परंपरा दाखवणाऱ्या घोडे मोडनी आणि फुगडी यासारख्या पारंपरिक लोकनृत्यांमध्ये गोव्याच्या जीवनाचे चित्रण करण्यात येते. शिमगोत्सवावेळी गोव्यात मिरवणूक काढतात. आकर्षक सजावट, चैतन्यपूर्ण वातावरण, गोव्यातील स्वादिष्ट पदार्थ, नृत्यसंगीताचे सादरीकरण यामुळे आनंद आणि उत्साह द्विगुणित होतो. महाराष्ट्रात होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते. (Holi Festival 2024)

(हेही वाचा – Swatantrya Veer Savarkar Film : इस्रायलचे राजदूत कोब्बी शोशानी यांच्याकडून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे कौतुक)

मणिपूर

मणिपूरमध्ये होळी अर्थात आयोसांग हा सण ६ दिवस साजरा केला जातो. होळी पौर्णिमेच्या दिवसापासून होळी खेळायला सुरुवात होते. येथील या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे थबल चोंगबा या मणिपुरी लोकनृत्याचे सादरीकरण यावेळी केले जाते. (Holi Festival 2024)

केरळ

केरळमध्ये होळी मंजल कुली या नावाने ओळखली जाते आणि ती गोश्रीपुरम थिरुमाच्या कोकणी मंदिरात साजरी केली जाते. येथे होळी पौर्णिमेच्या दिवशी विविध मंदिरांमध्ये उत्सव सुरू होतो. येथील कुडुंबी समाज सुमारे २० मंदिरांमध्ये ४ दिवसांच्या कालावधीत उत्सव साजरा करतो. कुडुंबीच्या काही मंदिरांमध्ये सुपारीचे झाड कापून ते मंदिरात नेले जाते, जे दुर्गा देवीचा राक्षसांवर विजय दर्शविते, तर काही मंदिरांमध्ये मातीचा वापर करून मगरी तयार केली जाते, जी देवीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. गोव्यातून केरळमध्ये स्थलांतरित होत असताना त्यांनी समाजाला मदत केली. उत्सवाच्या पुढच्या दिवशी, संपूर्ण कुडुंबी समाज, हळद मिश्रित पाणी एकमेकांवर फेकून रंग खेळतात, नाचतात आणि गातात. (Holi Festival 2024)

(हेही वाचा – Devendra Fadanvis : कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा देण्यावर काय म्हणाले फडणवीस?)

आसाम

आसाममध्ये होळी ‘फगवाह’ या नावाने साजरी केली जाते. आसामच्या सर्व स्थानिक प्रदेशांमध्ये होळीच्या वेळी समान विधी असली, तरी बारपेटा हा संपूर्णपणे अनोख्या आणि भव्य शैलीत साजरा करण्यासाठी ओळखला जातो. येथे २ दिवस होळी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. पहिल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करतात. (Holi Festival 2024)

गुजरात

‘गोविंदा आला रे, जरा मटकी संभल ब्रिजबाला…’ या लोकगीताच्या चैतन्यमय गुजरातमध्ये होळी साजरी होते. विशेषतः येथील तरुणांमध्ये या सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. मुले आणि मुली मिरवणुका काढतात. संघाने फिरतात. होळी खेळण्यासाठी विविध रंगांचा वापर करतात. लोणी आणि दूध या दिवशी प्रसाद म्हणून वाटले जाते. या परंपरेचा उगम भगवान श्रीकृष्णाच्या आख्यायिकेवरून झाला आहे, असे येथे मानले जाते. होलिकेला खोया अर्पण करतात आणि एकमेकांना तिलक लावतात आणि आपल्या प्रियजनांना मिठी मारतात. गुजरातमधील कुमारिका आदल्या रात्री लागलेल्या शेकोटीजवळ दिवा लावून तिला ‘गौरी’ मानून तिचे पूजन करतात. (Holi Festival 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.