Holi 2024 : भगवा रंग उधळुया चला…

कृष्ण जे गीतेमध्ये म्हणतो, ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे’ ते हेच आहे. ज्या युगासाठी जी भाषा आवश्यक आहे, त्या भाषेत हे महापुरुष गीता सांगतात. हिंदुराष्ट्रातील तत्वज्ञान हे अद्भुत आहे.

124
Holi 2024 : भगवा रंग उधळुया चला...
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘ज्या समाजाची जेथे असावी तेथे आस्था नसते आणि नसावी तेथे असते, तो समाज नामशेष होतो.’ आपण भाग्यवान आहोत की जेव्हा जेव्हा आपल्या समाजाची आस्था असावी तिथून उडाली, तेव्हा तेव्हा एक राम, एक कृष्ण, एक शिवराय, एक सावरकर आपल्याला भेटलेले आहेत. कृष्ण जे गीतेमध्ये म्हणतो, ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे’ ते हेच आहे. ज्या युगासाठी जी भाषा आवश्यक आहे, त्या भाषेत हे महापुरुष गीता सांगतात. हिंदुराष्ट्रातील तत्वज्ञान हे अद्भुत आहे. स्वर्गातले देव या हिंदुराष्ट्रकडे पाहत असतील तर त्यांनाही आपला हेवा वाटत असेल. हिंदुराष्ट्रात हिंदू म्हणून जन्मण्यासारखे दुसरे पुण्य आहे. आपल्याकडे आत्म्याला ८४ लक्ष योनीतून प्रवास करावा लागतो असे म्हणतात. मानवी जन्म मिळायच्या आधी विविध कीटक, प्राणी म्हणून जन्म घ्यावा लागतो. त्यानंतरच माणसाचा जन्म मिळतो. पण याही पुढे जाऊन मला असे सांगावेसे वाटते की मानवी जन्म मिळाल्यानंतर जर तुम्ही पुण्य कमावलेत तर तुम्हाला हिंदू म्हणून जन्म मिळतो. अमेरिकेतील माणूस सज्जनतेने वागला तर पुढच्या जन्मात त्याला हिंदू होण्याचे भाग्य मिळते. या जगामध्ये हिंदू म्हणून जन्माला येण्याइतके उत्तम, उदात्त, उन्नत दुसरे काही नाही. (Holi 2024)

भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. आपल्याकडे सगळे सण, उत्सव थाटामाटात साजरे होतात. उत्सवांवर आपली आस्था निर्माण होते. मात्र ते उत्सव ज्या तत्वासाठी आहेत, त्या तत्वावर बऱ्याचदा आपली आस्था नसते. किंबहुना तत्वावर आस्था ठेवावी असे आपल्याला कुणी शिकवलेले नसते. लक्षात घ्या, या जगाचे कल्याण करायचे असेल तर हिंदू टिकला पाहिजे. हिंदू जर नामशेष झाला तर हे जग कब्रस्थान होईल. या जगामध्ये नंदनवन फुलवण्याचे सामर्थ्य हिंदूंकडे आहे. आज जगामध्ये जे जे धर्म म्हणून अस्तित्वात आहेत, त्यांच्यात ज्येष्ठत्व हे हिंदूंकडे आहे. हिंदू हे पितामह आहेत आणि या नात्याने या सर्वांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ ही वसुधा एक कुटुंब करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. यासाठी आपण आपल्या मर्यादेच्या बेड्या मोडून पुढे गेले पाहिजे. हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. जेणेकरुन विश्वाला ते फळ चाखता येईल, ज्या फळाचा मनसोक्त आस्वाद आपण घेत आहोत. हिंदुत्वावर जसा आपला अधिकार आहे, तसा विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीचा असायला हवा. याचा अर्थ, मी इतरांना तुच्छ मानतोय असे समजू नका. तसे पाप माझ्याकडनं घडणारही नाही. मात्र ‘माझिया मराठीचे बोलू कवतिके, परि अमृतातही पैजा जिंके’ असे माऊली म्हणतात, तेव्हा ते इतर भाषेचा द्वेष करत नसतात तर मराठीचे कौतुक करत असतात. त्याप्रमाणे, त्यांचा आदर्श समोर ठेवून मी हिंदूत्वाचे कौतुक करतोय इतकेच! (Holi 2024)

(हेही वाचा – Devendra Fadanvis : कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा देण्यावर काय म्हणाले फडणवीस?)

२५ मार्चला होळी (Holi 2024) आहे आणि २६ मार्चला धुलिवंदन… या होळीमध्ये हिंदुत्वाबद्दल आपली जी अनास्था आहे, ती टाकून दिली पाहिजे. लक्षात असू द्या की आपली आस्था हिंदुत्वावर असायला हवी. होळीमध्ये ही अनास्था टाकल्यानंतर आणि आस्था धारण केल्यानंतर, धुलिवंदन (Holi 2024) साजरी करायची आहे. भगवा रंग उधळायचा आहे. प्रत्येकाला हे दिव्य हिंदुत्व समजावून सांगायचे आहे, साध्या, सोप्या, सरळ भाषेत. भगवा रंग जर लावला गेला, भारताचे भावविश्व जर हिंदू राहिले, सज्जनशक्ती एकसंध राहिली, तर आणि तरंच संविधान टिकणार आहे आणि ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ हा उदात्त हेतू साध्य होणार आहे. तर सज्जनहो या धुलिवंदनाला, भगवा रंग उधळुया चला… (Holi 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.