Swatantrya Veer Savarkar Film : इस्रायलचे राजदूत कोब्बी शोशानी यांच्याकडून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे कौतुक

156
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट (Swatantrya Veer Savarkar Film) प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकवर्गाची पसंती दिवसागणिक वाढत आहे. इस्त्रायलचे राजदूत कोब्बी शोशानी यांनीही या चित्रपटाचे स्वतः कौतुक केले आहे.
हा चित्रपट (Swatantrya Veer Savarkar Film) कोब्बी शोशानी यांनी पाहिल्यावर X वर त्यांनी यावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये कोब्बी शोशानी यांनी म्हटले की, ‘हा चित्रपट पाहणे भारताचा इतिहास नव्याने शोधण्याचा आणखी एक मार्ग आहे. भारत आणि इस्त्रायल या दोन्ही देशांतील अनेक गोष्टी सम्यक आहेत. सर्वांनी रणदीप हुड्डा यांचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट जरूर पहावा, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टचे मनापासून स्वागत केल्याचे दिसत आहे.

हा चित्रपट  (Swatantrya Veer Savarkar Film)  राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने करमुक्त करावा, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केली आहे. या चित्रपटाची पायरसी रोखावी म्हणून ‘हिंदुस्थान पोस्ट’ च्या वतीने ‘अँटी पायरसी सेल’कडे तक्रार आली आहे. त्याची सेलच्या वतीने दखल घेण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.