हिंदुंनो सावधान: संविधान दिंडी – एक भयंकर मोठे षडयंत्र!

हिंदू धर्माला एकसंध ठेवण्यामध्ये आणि धर्माची कीर्ती वाढवण्यात वारकरी सांप्रदयाचा मोठा वाटा आहे.

180
हिंदुंनो सावधान: संविधान दिंडी - एक भयंकर मोठे षडयंत्र!

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सद्गुणविकृता हा शब्दप्रयोग केलेला आहे. हिंदुंमध्ये पराकोटीचे सद्गुण आहेत. मात्र हे सद्गुण नको तिथे वापरल्याने त्याचे विकृतीत रुपांतर होते, म्हणजे अती सद्गुनामुळे हिंदू स्वतःचे नुकसान करुन घेतात यास सद्गुणविकृत हा शब्द वापरण्यात आलेला आहे. हिंदू हा मुळातच उदारमतवादी आणि नव्या विचारांसाठी दरवाजा सताड उघडा ठेवणारा आहे. हिंदूंनी आपल्या धर्मात देखील अनेक सुधारणा घडवून आणल्या. डॉ. आंबेडकर, वीर सावरकर यांसारखे महापुरुष अशा कार्यात आघाडीवर होते.

वारकारी हा महाराष्ट्रातला मोठा सांप्रदाय आहे. हिंदू धर्माला एकसंध ठेवण्यामध्ये आणि धर्माची कीर्ती वाढवण्यात वारकरी सांप्रदयाचा मोठा वाटा आहे. विठ्ठल हे त्यांचे आराध्य आणि महाराष्ट्रातील संत मंडळी हे मार्गदर्शक… हिंदूंच्या मनात वारी आणि वारकरी यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. अनेक वर्षांपासून ही परंपरा योग्य रितीने सुरु होती. मात्र या पवित्र वारीत आता राजकारण घुसले आहे. संविधान दिंडीच्या निमित्ताने जे लोक शिरकाव करत आहेत. त्यांची हिंदू धर्मावर, विठ्ठलावर श्रद्धा आहे काय? हा महत्वाचा प्रश्न आहे.

(हेही वाचा – महाकाल मंदिरामध्ये भाविकांना गर्भगृहाबाहेरून दर्शन घ्यावे लागणार)

जो संविधानाला विरोध करतो तो काफीर असा विचार यानिमित्ताने मांडण्यात आला. मात्र संविधानाला कोण विरोध करतो? हिंदू हे संविधान मानणारे आहेत. या देशात बहुसंख्य हिंदू असल्यानेच भारताला संविधान लाभले आहे आणि इथली लोकशाही शाबूत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बरं, हिंदूंच्या संतांनी समता हा विचार याआधीच मांडून ठेवला आहे. आपापसातील भेद विसरुन एकत्र यायला संतांनी शिकवले आहे. वारकरी सांप्रदाय अथवा हिंदुंना विशेषतः संविधान शिकवण्याची गरज आहे की अतिरेकी कारवाया करणार्‍यांना संविधान शिकवले पाहिजे?

जे मूल खोड्या काढतं त्याला दोन शहाणपणाचे शब्द शिकवणार की जे मूल नेहमी शांत असतं त्यालाच शहाणपणाचे डोस पाजणार हा प्रश्न इथे निर्माण होतो. संविधान दिंडीच्या निमित्ताने जे लोक वारीत शिरकाव करु पाहत आहेत त्यांचा मूळ हेतू काय आहे? धार्मिक तेढ वाढवणं हा तर त्यांचा हेतू नाही ना, हे तपासून पाहावं लागणार आहे आणि इतर धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमात संविधान शिकवलं जाणार आहे की नाही? हाही प्रश्न इथे यानिमित्ताने विचारावासा वाटतो. आपल्या धार्मिक कार्यक्रमात नको ती मंडळी शिरकाव करत आहेत, हे समजून घेतले नाही तर पुढे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते का? याचे परिणाम काय होणार? यावर हिंदूंमधील पदाधिकार्‍यांनी विचार करणे आवश्यक आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.