धाकधूक वाढली! अफ्रिकेतून राज्यात आलेले 6 बाधित प्रवासी ‘या’ शहरात?

68

दक्षिण आफ्रिकेसह इतर जोखमीच्या देशातून राज्यात आलेले 6 प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यामुळे देशात पुन्हा एकदा धाकधूक वाढली आहे. दक्षिण आफ्रिका आणि युरोपात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलत आहे. अशापरिस्थितीत दक्षिण अफ्रिकेसह इतर जोखमीच्या देशातून राज्यात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. विशेष म्हणजे हे नवे सहाही रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले असून कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर मनपा आणि पुणे या भागात आलेला प्रत्येकी एक प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे सांगितले जात आहे. तर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत नायजेरियातून आलेले दोन जण बाधित आढळले आहेत. या प्रवाशांचे स्वॅब जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत.

ओमिक्रॉनच्या देशात धोका?

ओमिक्रॉनच्या धोका देशात वाढला असताना दक्षिण आफ्रिकेतून एक जण हा डोंबिवली शहरात आला त्यानंतर मुंबईत भितीचं वातावरण पसरले. या संबधित प्रवाशासह त्याच्या कुटुंबियांचीही चाचणी करण्यात आली त्यात तो बाधित असल्याचे समोर आले. मात्र दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले इतर पाच जण मात्र पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, भाईंदरमधल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे तर पिंपरीच्या दोघा जणांचा समावेश आहे. या प्रवाशांचे स्वॅब जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठविण्यात आले असून त्याचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – लसवंत असाल तरच आता रिक्षा-टॅक्सीत मिळणार एन्ट्री!)

सतर्कता म्हणून मुंबईसह पुणे आणि इतर शहरं सज्ज

ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव बघता सतर्कता म्हणून मुंबईसह पुणे आणि इतर शहरं सज्ज होत आहेत. या व्हेरियंटचा धोका लक्षात घेता नाशिक, पुणे, मुंबईसारख्या महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. यासह गेल्या काही दिवसांत दक्षिण अफ्रिकेसह इतर जोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांचे महाराष्ट्रात ट्रेसिंग सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांपूर्वी मुंबईत 466 जण आले होते. त्यापैकी 100 जण हे मुंबईतील आहे. या सर्वांचा शोध सुरू असून त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. या शोध मोहिमेदरम्यान, चाचणीत डोंबिवलीमध्ये असणाऱ्या रूग्णाचा शोध लागला आहे. हा रूग्ण 40 वर्षीय असून तो दक्षिण आफ्रिकेचाच रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.