Happy Birthday Sachin : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ५१ वा वाढदिवस

भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला देवाची उपाधी मिळालेली आहे

145
Happy Birthday Sachin : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ५१ वा वाढदिवस
Happy Birthday Sachin : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ५१ वा वाढदिवस
  • ऋजुता लुकतुके

आधुनिक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बुधवारी आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर तेव्हा १६ वर्षाच्या असलेल्या सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) झलक पहिल्यांदा जगाला दिसली होती. आणि त्यानंतर २२ वर्षांच्या त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याचे जगभरात करोडो चाहते निर्माण झाले. १०० आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमासह अनेक नवे फलंदाजीचे विक्रम या अवलियाने त्यानंतर रचले. (Happy Birthday Sachin)

एरवी प्रसारमाध्यमांसमोर फारसं व्यक्त न होणारे सर डॉन ब्रॅडमनही एकदा आपल्या पत्नीला म्हणाले होते की, ‘हा मुलगा माझ्यासारखा खेळतो.’ आणि तो मुलगा सचिन होता हे वेगळं सांगायला नको. सचिन फलंदाजीसाठी उतरताना त्याची एक झलक पाहण्यासाठी स्टेडिअमवर जी गर्दी व्हायची ती अजूनही डोळ्यासमोरून हटत नाही.

(हेही वाचा – Mumbai Suburbs मध्ये निवडणुकीसंदर्भातील ७९१४ तक्रारींची पोर्टलवर दखल)

आपल्या कारकीर्दीत सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) १८,४२६ एकदिवसीय धावा केल्या. तर १५,९२१ कसोटी धावा केल्या. २०११ चा एकदिवसीय विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोठी भूमिका निभावली. १०० आंतरराष्ट्रीय शतकं करण्याची कामगिरी करणारा तो एकमेवाद्वितीय आहे. यातील ४९ एकदिवसीय तर ५१ कसोटी शतकं आहेत.

विराट कोहलीने (Virat Kohli) अलीकडेच एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडला. तो क्षण अनुभवायला सचिन स्टेडिअमवर हजर होता. आणि विराटने विक्रमानंतर पहिली मानवंदना दिली ती सचिनलाच.

(हेही वाचा – Amit Shah: आरक्षण हटवणार नाही ही मोदीची गॅरंटी: अमित शाह)

२०१२ मध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केलं. आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये आपली २०० वी कसोटी खेळून त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केलं. त्याने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आणि यात ३४,३५७ धावा केल्या. सध्या तो मुंबई इंडियन्स या आयपीएल फ्रँचाईजीचा मेंटॉर आहे.

(हेही वाचा – Mumbai Suburbs मध्ये निवडणुकीसंदर्भातील ७९१४ तक्रारींची पोर्टलवर दखल)

अशा या सचिन तेंडुलकरला ५१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.