महान वैज्ञानिक, भारतरत्न C V Raman

113
सी.व्ही. रामन (C V Raman) म्हणजे चंद्रशेखर व्यंकट रामन म्हणून हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी रामन इफेक्ट चा शोध लावून भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या या शोधामुळे लाईट जेव्हा सॉलिड, लिक्विड, गॅस अशा वेगवेगळ्या माध्यमातून भ्रमण करत असते तेव्हा वेग व गुणांमध्ये बदल जाणवून येतो. यामुळेच समुद्राच्या पाण्याच्या निळ्या रंगाचं रहस्य उलगडतं.
सी.व्ही रामन (C V Raman) यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ मध्ये तिरुचिरापल्ली मद्रास प्रेसिडेन्सी येथे झाला. त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर भौतिकशास्त्र आणि गणिताचे अभ्यासक होते. रामन लहानपणापासून खूप हुशार आणि बुद्धिवान होते. शाळेत नेहमी त्यांचा प्रथम क्रमांक यायचा. त्यांना कल हा निसर्गाकडे आणि संशोधनाकडे होता. बाराव्या वर्षीच त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी रामायण, महाभारतासारख्या ग्रंथाचे अध्ययन केले.
पुढे १९०३ मध्ये त्यांनी चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. रामन यांच्या बुद्धिमत्तेवर त्यांचे प्राध्यापक इतके खुश होते की कोणत्याही वर्गात त्यांना मुक्त प्रवेश मिळत असे. त्यांची ज्ञान लालसा प्रचंड होती. भौतिकशास्त्रात त्यांना सुवर्ण पदक देखील मिळाले आहे.
१९०७ मध्ये त्यांनी मद्रास विश्वविद्यालयातून गणितात प्रथम श्रेणीत एमए ची डिग्री मिळवली. पुढे त्यांनी कोलकोतातील इंडियन फायनान्स सर्व्हिस येथे असिस्टंट अकाउंटट म्हणून नोकरी केली. पण केवळ नोकरी करुन पैसे कमावणे एवढंच त्यांचं ध्येय नव्हतं. त्यांना संशोधन क्षेत्रात अधिक रुची होती.
पुढे त्यांना इंडियन असोसिएशन फॉ द अप्लायन्सेस ऑफ सायन्स या संशोधन शाखेद्वारे खाजगी शोध करण्याची परवानगी मिळवली. १९१७ मध्ये ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. तसेच भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे सचिव पद देखील मिळाले. १९२१ मध्ये त्यांनी लंडनमध्ये रुदरफोर्ड आणि जे जे थॉमसन यांची भेट घेतली. त्यामुळेच त्यांचे प्रयोग रॉयल सोसायटीच्या मासिकांमध्ये प्रसिद्ध होऊ शकले. पाण्याला निळेपण आकाशाच्या सावलीमुळे येत नाही तर पाण्याच्या रंगामुळेच येतो असा निष्कर्ष त्यांनी मांडला.
त्यांचा रामन इफेक्ट हा शोध जगभरात गाजला. त्यांनी प्रकाशाचे विकरण यावर अत्यंत सखोल निरीक्षण केले आणि आपले स्पष्टीकरण मांडले आहे. त्यांना नोबल पुरस्कार देखील मीळाला आहे. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय व आशियाई ठरले आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.