इंटरनेट संपले? ‘या’ अ‍ॅपचा वापर करत मिळवा मोफत वायफाय!

119

अलिकडे तरूणाईमध्ये सोशल मीडियाविषयी प्रचंड क्रेझ आहे. स्मार्टफोन, इंटरनेट या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक झाल्या आहेत. कोरोना काळात तर, शालेय शिक्षण, ऑफिस कामकाज सर्व काही इंटरनेट सेवेवर अवलंबून होते. इंटरनेटचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

कित्येक वेळा नेटवर्क समस्येमुळे इंटरनेट बंद होते आणि अशावेळी कामकाजाचा खोळंबा होतो. परंतु आता तुमच्या समस्येचे निराकरण होणार आहे. कारण फेसबुक ( Facebook) हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फ्रि वायफाय ( Free Wi-Fi ) सेवा ऑफर करते. काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्यास तुम्हाला मोफत इंटरनेट सेवा मिळू शकेल.

( हेही वाचा : …तर वाहनचालकांना दर दिवशी होणार ५० रुपये दंड! )

मोफत वायफाय सेवा

  • फेसबुक अॅप आपल्याला मोफत किंवा सार्वजनिक हॉटस्पॉट बद्दल माहिती देते. यामुळे मोफत इंटरनेटचा लाभ घेता येईल.
  • फेसबुक अॅप ओपन करून Three डॉट मेन्यूवर क्लिक करा.
  • पुढे सेटिंग आणि प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Find Wi-Fi पर्याय निवडा.
  • यानंतर फेसबुक अॅप तुम्हाला जवळपासच्या वायफाय हॉटस्पॉटची माहिती देईल. यामध्ये पेड आणि मोफत हॉटस्पॉट दोन पर्याय उपलब्ध असतील. तसेच अॅपमध्ये तुम्हाला वायफायच्या ठिकाणाचे नाव आणि मॅप दोन्ही माहिती मिळेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.