भारीच! रांगेत उभा राहून, तो दिवसाला कमावतो 16 हजार…

76

आपल्या सगळ्यांनाच रांगेत उभं राहून तिकीट जरी काढायच म्हटलं तरी वैताग येतो. पण एखाद्या माणसाचा रांगेत उभं राहणे हाच जाॅब असेल तर… हो हे खरय, एक तरुण रांगेत उभं राहून दिवसाला 160 पाउंड म्हणजे तब्बल 16 हजारांची कमाई करतो. लंडनमध्ये राहणारा फ्रेडी बेकिट हा तरुण श्रीमंत व्यक्तींसाठी रांगेत उभं राहतो. तो एका तासाचे 20 पाउंड घेतो.

तरुणाची भन्नाट कल्पना

31 वर्षांचा असणारा फ्रेडी बेकिट हा लंडनमधील फुलहम येथे राहणारा आहे. त्याने पैसे कमवण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. फुलहममध्ये राहणारा फ्रेडी बेकिट याने गेल्या तीन वर्षांपासून दुसऱ्यांसाठी लांबच लांब असणाऱ्या रांगेत उभा राहून, खूप सारा पैसा कमवला आहे. यामुळे त्याने आता पूर्णवेळ व्यवसाय सुरू केला आहे. त्याची कमाई ऐकून अनेक जणांना धक्का बसतो, कारण तो दिवसाला 16 हजारांपेक्षा जास्त रक्कम कमवतो. त्याच्या या हिशोबानुसार तो महिन्याला किमान 5 लाख रुपये कमवत आहे. त्याच्या या व्यवसायाची कमाई ऐकून अनेक जणांच्या भुवया उंचवतात.

( हेही वाचा :पटोले म्हणतात ‘त्या’ गावात खरचं मोदी नावाचा गावगुंड आहे का? काय आहे वास्तव? )

रांगेत उभं राहण्याचे पैसे 

फ्रेडीच्या या व्यवसायामध्ये असे ग्राहक आहेत ज्यांना रांगेत उभे राहणे आवडत नाही. असे लोक फ्रेडी बेकिट याला बोलवून घेतात, आणि त्यासाठी मोठी रक्कमही त्याला देतात. एखादी म्युझिक कॉन्सर्ट असेल, तर त्याच्या तिकीटासाठी लोक फ्रेडीकला रांगेत उभं राहण्यासाठी पैसे देतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.