तुम्ही वाहन चालवताना हेल्मेट वापरताय ना? नाहीतर…

83

शहरात वाहनांवरून प्रवास करताना तुम्ही हेल्मेट वापरताय का? वापरत असाल तर तुमच्यासाठी ते चांगले आहे आणि जर वापरत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्की महत्त्वाची आहे. कारण वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यासह विना हेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्याावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.

(हेही वाचा – NEET PG 2022: परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार, काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?)

मिळालेल्या माहितीनुसार, विना हेल्मेटप्रकरणी महिन्याभरात ५६ हजार ४९८ गुन्हे पोलीस दफ्तरी नोंद झाले असून, यापैकी वारंवार उल्लंघन करणाऱ्या ५ हजार ४४१ जणांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी आरटीओकडे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे वेळीच नियमांचे पालन न केल्यास तुमचाही परवाना रद्द होऊ शकतो, असा इशारा वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईत ५६ हजार विना हेल्मेट असणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही देखील नियमांचे पालन करा नाहीतर तुमचाही परवाना रद्द होऊ शकतो.

दरम्यान, मुंबईत गेल्या वर्षी २ हजार १९२ अपघातात ३४६ जणांचा बळी गेला आणि तब्बल दीड हजार जण गंभीर जखमी झाले. दुसरीकडे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी २१ लाख ८१ हजार ६१८ कारवाया केल्याची माहिती मिळतेय. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही विना हेल्मेटच्या होत्या त्यावर कारवाई करण्यात आली.आता पोलीस प्रत्यक्ष कारवाई न करता कॅमेऱ्यात नियमांचे पालन न केलेल्यांचा हा प्रताप केंद करत आहे. त्यांना ई चलान पाठवून त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ नो एन्ट्री (६,६३,२८५), सिग्नल जम्पिग (३,४२,३२९), भरधाव वेगाने वाहन चालवणे (१, २७, ७९०), सीट बेल्ट न लावणे (९५, १६०) कारवाया केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.