पुणे महामार्गावरील भीषण अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू!

102

पुणे नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात शिक्रापूर इथे झाल्याची माहिती मिळाली आहे. ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने, डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला गेल्यामुळे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

५ मृत्यू, ५ गंभीर जखमी

प्राथमिक माहितीनुसार ५ जणांचा विचित्र अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील २४ वा मैल इथे भीषण अपघात झाला. ट्रकने कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना जोरदार धडक दिली. ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेला जात होता. ट्रक हा तळेगाव ढमढेरे गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर फरार झाला असून, पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहेत. फोर व्हीलर वाहन आणि दोन्ही टू व्हीलर नगरकडून पुण्याच्या दिशेने चालले असताना, ट्रक डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाऊन कार आणि दोन बाईकला धडकला. या भीषण अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी आहेत.

( हेही वाचा :….म्हणून मुंबईकरांना वाटतंय आपल्या मालकीचं घर असावं! )

घटनेचा तपास सुरु

अपघातात बाईकवरील विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे या  दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमधील एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नसून, जखमींची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. अपघातामुळे मात्र महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले असून, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी आणि उपनिरीक्षक अमोल खटावकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, संबंधितावर गुन्हा दखल करण्याचं काम केलं आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.