Nude Photoshoot: ‘त्या’ आक्षेपार्ह फोटो प्रकरणी अभिनेता रणवीर विरोधात FIR दाखल

109

आक्षेपार्ह फोटो प्रकरणी अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अंतर्गत त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

(हेही वाचा – तुम्ही SBI, HDFC, ICICI बँकेचे ग्राहक आहात? तर तुमच्यासाठी खुशखबर, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा)

काही दिवसांपूर्वी रणवीरने न्यूड फोटोशूट केले होते. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याच्या या फोटोशूटचे काहींनी कौतुक, तर काहींनी टीकाही देखील केली आहे. दरम्यान श्याम मंगाराम फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या ललित श्याम यांनी महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत चेंबूर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज, मंगळवारी रणवीर विरोधात भादंवि कलम २९२, २९३, ३५४, ५०९, आयटी कायदा कलम ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणणे आहे तक्रारदाराचे

तक्रारदार ललित श्याम यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारे फोटोशूट करून रणवीरने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले आहे. यातून त्याने महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. आपला देश हा संस्कृतीचं जतन, पूजा करणारा देश आहे. देशात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. परंतु या स्वातंत्र्याचा कुठे तरी गैरवापर होत आहे. देशात अभिनेत्याला नायक संबोधले जाते. नायकाला शेकडो काय लाखो चाहते असतात. ते त्या नायकाचे अनुकरण करत असतात. त्यामुळे रणवीरने केले न्यूट फोटोसूट करणे चुकीचं आहे. आम्ही गेल्या सहा वर्षांपासून विधवा महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करीत आहोत. गेल्या आठवड्यात आम्ही रणवीर सिंगचे काही न्यूड फोटो व्हायरल होताना पाहिले. ते फोटो ज्या पद्धतीनं क्लीक केले आहेत ते पाहून कोणाही महिला किंवा पुरुषाला लाज वाटावी.

तक्रारदारांच्या वकिलांनी म्हटले की, आमची मागणी रणवीर सिंहला अटक करावी, अशी आहे. कलमांची व्याप्ती पाहता भादंवि कलम २९२ अंतर्गत ५ वर्षे, कलम २९३ अंतर्गत ३ वर्षे शिक्षेची तरतूद आहे. तसेच आयटी कायदा कलम ६७(अ) नुसार ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.