FASTag : आता प्रवाशांना लवकरच फास्टॅगमधून कापलेली रक्कम परत मिळणार

चाकरमान्यांच्या संतापानंतर परिवहन विभागाने घेतला निर्णय

113
FASTag : आता प्रवाशांना लवकरच फास्टॅगमधून कापलेली रक्कम परत मिळणार

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी (FASTag) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तशी घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली होती. शुक्रवारपासूनच (१५ सप्टेंबर) प्रवाशांनी गावची वाट धरली. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशातच टोलमाफी असतानाही गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून (FASTag) परस्पर टोलची रक्कम कापली गेली त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. टोलनाक्यावर बसवलेल्या फास्टॅगमधून टोलमाफी कशी मिळणार याबाबतची माहिती टोलमाफीच्या घोषणेत नसल्यामुळे टोलनाक्यावर पोहोचलेल्यांचे पैसे कापले गेले आहे. मात्र असे कसे झाले असा प्रश्न प्रवाशांमध्ये उपस्थित होत होता.

या सर्व पार्श्वभूमीवर आता परिवहन विभाग फास्टॅगमधून (FASTag) कापलेले पैसे संबंधितांना परत करणार आहे.

(हेही वाचा – Women’s Reservation Bill : आरक्षणातून महिलांना अधिकार मिळतील – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा)

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफीचा (FASTag) निर्णय घेऊनही गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून परस्पर टोलची रक्कम कापली गेल्याने काहींनी परिवहन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.

टोलमाफी असताना काही वाहनांच्या फास्टॅगमधून (FASTag) रक्कम गेली आहे. याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविणार आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्णय घेतल्यास वाहन चालकांना त्यांची रक्कम परत मिळेल, असे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच प्रवाशांना फास्टॅगमधून कापलेली रक्कम परत मिळणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.