सुप्रसिद्ध नंबर १ टेनिसपटू Jennifer Capriati

94
सुप्रसिद्ध नंबर १ टेनिसपटू Jennifer Capriati
सुप्रसिद्ध नंबर १ टेनिसपटू Jennifer Capriati

जेनिफर मारिया कॅप्रियाती (Jennifer Capriati) ही अमेरिकन माजी जागतिक क्रमवारीत नंबर १ वर असलेली टेनिस खेळाडू आहे. ती आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमची (International Tennis Hall of Fame) सदस्य देखील आहे. तिने तीन एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले आहेत आणि १९९२ मध्ये समर ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. जेनिफरचा जन्म २९ मार्च १९७६ रोजी यूएस येथील न्यू यॉर्क शहरात झाला. तिच्या वडिलांचे नाव डेनिस आणि आईचे नाव स्टेफानो असे होते आणि ते इटालियन वंशाचे होते.

(हेही वाचा – Congress IT Notice : काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नोटीस; IT विभागाची १७०० कोटींची नोटीस)

सर्वांत तरुण खेळाडू

जेनिफर कॅप्रियातीने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक विक्रम केले. तिने १९९० मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले आणि ती बोका रॅटन, फ्लोरिडा येथे झालेल्या हार्ड-कोर्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली. तिने तिच्या पदार्पणातच फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली आणि नंतर त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वयाच्या १४ व्या वर्षी टॉप १० मध्ये पोहोचणारी ती सर्वांत तरुण खेळाडू ठरली.

१९९९ मध्ये स्ट्रासबर्ग येथे पहिले विजेतेपद जिंकले

१९९३ यूएस ओपनमध्ये पहिल्या फेरीतील पराभवानंतर तिने स्पर्धात्मक प्रो टेनिसमधून १४ महिन्यांचा ब्रेक घेतला. १९९८ मध्ये, जेनिफरने विम्बल्डनमध्ये पाच वर्षांतील तिचा पहिला ग्रँड स्लॅम एकेरी सामना जिंकला. तिने १९९९ मध्ये स्ट्रासबर्ग येथे सहा वर्षांतील पहिले विजेतेपद जिंकले आणि पुन्हा टॉप-२० रँकिंग मिळवले. तिने ऑक्टोबरमध्ये महिला टेनिस असोसिएशन नंबर १ रँकिंगवर आपले नाव कोरले आणि त्याच वर्षी फ्रेंच ओपन जिंकले. तिने तिच्या कारकिर्दीत १४ व्यावसायिक एकेरी स्पर्धा जिंकल्या, एका महिला दुहेरी चॅम्पियनशिपवर देखील आपले नाव कोरले आहे. (Jennifer Capriati)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.