धिना धिन धा आणि झकास म्हणजेच एव्हरग्रीन Anil Kapoor

127
अनिल कपूर (Anil Kapoor) आता ६६ वर्षांचा झाले आहेत यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. अजूनही अनिल कपूर यांची फिटनेस तरुणाला लाजवेल अशी आहे. कपूर कुटुंब हे बॉलिवुडमधलं एक मोठं कुटुंब आहे. पृथ्वीराज कपूर आणि अनिल कपूर यांचे वडील सुरिंदर कपूर हे चुलत भाऊ. सुरिंदर कपूर स्वतः निर्माते होते.
आताच आलेल्या ऍनिमल चित्रपटासाठी अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या अभिनयाची स्तुती होत आहे. अनिल कपूर यांनी १९७९ साली सहाय्यक अभिनेता म्हणून आपला बॉलिवूडचा प्रवास उमेश मेहरा यांच्या ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटातून सुरू केला. त्यानंतर हम पांच, शक्ती या चित्रपटात सामान्य भूमिका केल्या. मात्र ’वो सात दिन’ या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली व त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपली छाप पाडली.
अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी नंतर टॉलीवूडमध्ये अभिनय करण्याचा प्रयत्न केला आणि तेलुगू चित्रपट ‘वंमसावृक्षन’ आणि मणिरत्नमचा पहिला कन्नड चित्रपट ‘पल्लवी अनुपल्लवी’ मध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी यश चोप्रा यांच्या ‘मशाल’ काम केले आणि या चित्रपटातील कपूर यांच्या अभिनयाची चर्चा होऊ लागली. कारण त्यांच्यासमोर होते भारदस्त अभिनेते दिलीप कुमार. त्यांच्यासोबत अभिनयाची जुगलबंदी त्यांनी उत्तमरित्या केली.

झकास म्हणजेच अनिल कपूर अशी ओळख मिळाली

‘मेरी जंग’ या चित्रपटात तर त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाद्वारे सर्वांनाच मोहित केले.  ‘कर्मा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’ असे सिनेमे केले. ज्यामुळे त्यांना स्टारडम प्राप्त झाले.  त्यांना पुकार आणि गांधी माय फादरसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा झकास हा संवाद खूप गाजला. झकास म्हणजेच अनिल कपूर (Anil Kapoor) अशी ओळख मिळाली. अनिल कपूर आजही देखणे दिसतात आणि आजही आपल्या अभिनयाने लोकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९५६ झाला. आज त्यांचा वाढदिवस… हिंदुस्थान पोस्टतर्फे झकास अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा…
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.