Dadar Savarkar Market: दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईचे प्रवेशद्वार फेरीवाल्यांनी अडवले

मंडईमध्ये रितसर भाडे भरून व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांचा व्यवसाय होत नाही.

1200
Dadar Savarkar Market: दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईचे प्रवेशद्वार फेरीवाल्यांनी अडवले
Dadar Savarkar Market: दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईचे प्रवेशद्वार फेरीवाल्यांनी अडवले

महापालिका बाजार अर्थात मंडईपासून शंभर मीटर परिसरात फेरीचा व्यवसाय करण्यास पूर्णपणे बंद असतानाही प्रत्यक्षात या क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत नाहीच. उलट याच फेरीवाल्यांनी महापालिकेच्या मंडईला विळखा घालण्यास सुरुवात केली. दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर महापालिका (Dadar Savarkar market) मंडईचेही प्रवेशद्वार अशाचप्रकारे फेरीवाल्यांनी अडवून टाकले आहे. भाजी, फळे आणि मासळी विक्रीच्या या मंडईच्या प्रवेशद्वाराजवळच कपडे विक्रेत्यांचे स्टॉल्स थाटले गेले असून ही कपड्याची दुकानेच अनधिकृत असताना बाजार निरीक्षकांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळ महापालिकेची स्वातंत्र्यवीर सावरकर महापालिका मंडई असून रानडे मार्गावर याचे मुख्य प्रवेशद्वार आहे, तर डिसिल्व्हा मार्गावर याचे दुसरे प्रवेशद्वार आहे, मात्र रानडे मार्गावरील प्रवेशद्वाराजवळ फूल विक्रेत्या महिला अधिकृतपणे व्यवसाय करत असल्यास, तरी याच्या शेजारीच प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला कपड्यांचे दोन स्टॉल्स आहेत. येथे कपड्यांच्या खरेदीला येणारे ग्राहक हे मंडईचा प्रवेशद्वार अडवतात. त्यामुळे मंडईमध्ये प्रवेशद्वाराजवळ होणाऱ्या गर्दीमुळे अन्य नागरिकांना भाजी किंवा अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी प्रवेशच करता येत नाही.

(हेही वाचा – Balmohan Vidyamandir School : बालमोहन विद्यामंदिर शाळेतील ३ माजी विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीमध्ये समावेश )

विशेष म्हणजे रानडे रोड मार्गावरील मंडईच्या प्रवेशद्वाराजवळ असणारे हे कपडे विक्रेते अधिकृत नसून या कपडे विक्रेत्यांकडून एका बाजूला प्रवेशद्वार अडवलेच जात आहे, शिवाय या प्रवेशद्वाराच्या समोर पदपथावरही फेरीवाले आपला व्यवसाय थाटतात. त्यामुळेही या मंडईचे प्रवेशद्वारच झाकले जात असल्याने अनेक नागरिकांना या ठिकाणी मंडईच असल्याची माहिती होत नाही. परिणामी या मंडईमध्ये रितसर भाडे भरून व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांचा व्यवसाय होत नाही. या मंडईमध्ये सकाळच्या वेळी भाजी विक्रीचा व्यवसाय सोडला, तर त्यानंतर मंडईमध्ये भाजीसह इतर वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांना माशा मारत बसण्याची वेळ येत आहे. त्यामुळे मंडईतील गाळेधारक धंदा होत नसल्याने त्रस्त असताना दुसरीकडे मंडईचा प्रवेशद्वार अशाप्रकारे कपडे व्यापाऱ्यांकडून अडवला जात असतानाही महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने गाळेधारकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.