राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच सुधीर मुनगंटीवार यांचे हिंदु जनजागृती समितीला आश्वासन!

115

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाची बाजी लावून गडकिल्ले जिंकले आहेत. आपण कायद्याची बाजू लावून धरणार आणि गडांवरील अतिक्रमणे हटवणारच, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून विरोध होत असला, तरी सरकार अतिक्रमण हटवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, याविषयी आमचा निर्धार पक्का आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले. राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर झालेली अतिक्रमणे हटवण्याच्या संदर्भात ‘हिंदु जनजागृती समिती’चे राज्य संघटक आणि ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’चे प्रवक्ता सुनील घनवट यांनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुनगंटीवार यांनी हे आश्वासन दिले.

अतिक्रमणे हटवणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना काही धर्मांधांकडून, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून धमक्या येत असल्याचे घनवट यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांना सांगितले. याविषयी मुनगंटीवार म्हणाले की, कितीही धमक्या आल्या, तरी आम्ही अतिक्रमणे हटवणार आहोत. धमक्या देणाऱ्यांवरही आम्ही कारवाई करू. समितीने दिलेल्या निवेदनांच्या संदर्भात बोलतांना सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, तुम्ही दिलेली गडकिल्ल्यांच्या संदर्भातील निवेदने वेगवेगळ्या खात्यांशी संबधित आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवून घेण्याचे आदेशही यावेळी दिले. विशाळगडावर शासकीय योजना राबवून अतिक्रमण झाले असेल, तर ते गंभीर आहे. कुठल्याही परिस्थितीत ही अतिक्रमणे काढली जाणारच आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या थडग्याभोवतीचे वर्षानुवर्षे ‘संरक्षित’ केलेले अतिक्रमण हटवले, यासंदर्भात मुनगंटीवार यांचे हिंदु जनजागृती समितीच्यावतीने अभिनंदनही करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.