Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना मिळाले राम मंदिराच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याचे आमंत्रण

२२ जानेवारीला होणाऱ्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना मिळाल्यासंदर्भातील ट्विट एएनआयने आपल्या अधिकृत 'X' या सोशल मिडियावर शेअर केले आहे.

147
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना मिळाले राम मंदिराच्या 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे आमंत्रण
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना मिळाले राम मंदिराच्या 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे आमंत्रण

अयोध्येत सध्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. विविध देश सोहळा भक्तिभावपूर्ण होण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. २२ जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्याचे आमंत्रण अनेक दिग्गज आणि प्रतिष्ठित व्यक्तिंना देण्यात येत आहे. नुकतेच राम मंदिराच्या ‘प्राणप्रतिष्ठा सोहळ्या’चे आमंत्रण मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) मिळाल्याची माहिती ‘X’द्वारे शेअर करण्यात आली आहे.

२२ जानेवारीला होणाऱ्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना मिळाल्यासंदर्भातील ट्विट एएनआयने आपल्या अधिकृत ‘X’ या सोशल मिडियावर शेअर केले आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे.’  राम मंदिराचे पदाधिकारी प्रतिष्ठापना सोहळ्याची निमंत्रण पत्रिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत असताना काढलेले छायाचित्रही या ट्विटसोबत जोडण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.