महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरी ईडीची छापेमारी; आढळल्या कोट्यावधींच्या एफडी आणि…

ही छापेमारी कोरोना काळात झालेल्या कोव्हिड सेंटरच्या घोटाळ्याशी संबंधित आहे.

150
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरी ईडीची छापेमारी; आढळल्या कोट्यावधींच्या एफडी आणि...

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून ईडीने १६ ठिकाणी छापेमारी केली. राजकीय नेते आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरी ही छापेमारी करण्यात आली आहे. महापालिकेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांसह ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या घरी ही छापेमारी करण्यात आली आहे. ही सर्व छापेमारी कोरोना काळात झालेल्या कोव्हिड सेंटरच्या घोटाळ्याशी संबंधित आहे.

बुधवारी (२१ जून) सकाळी ईडीने कारवाईस सुरुवात केली होती. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. याचवेळी सनदी अधिकारी संजीव जयस्वाल, महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरीदेखील ईडीचे पथक धडकले. या धाडस सत्रामुळे एकच खळबळ उडाली होती.

(हेही वाचा – “विरोधकांची वज्रमूठ सैल करण्याचं काम १४० कोटी जनता करेल”; विरोधकांच्या बैठकीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका)

यावेळी सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्याकडून ईडीला १०० कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. तसेच १५ कोटींच्या एफडी आणि १३ लाखांची रोख रक्कमही सापडली आहे. तसेच जयस्वाल यांच्या पत्नीकडे ३४ कोटींची संपत्ती आहे. शिवाय मढ आयलंडला त्यांचा अर्ध्या एकरचा भूखंड देखील आहे.

या छापेमारीनंतर ईडीने जयस्वाल यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र जयस्वाल ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीकडे चार दिवसांचा वेळ मागितला आहे. चार दिवसानंतर जैयस्वाल ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, जयस्वाल यांच्या घरी मोठं घबाड सापडल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.