ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना ईडीचे समन्स; २६ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली.

174
ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना ईडीचे समन्स; २६ जूनरोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी बुधवार 22 जून रोजी ईडीची धाड (ED Raid) पडली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाड टाकली. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली. सूरज चव्हाण यांच्या चेंबुरमधील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली. तब्बल 17 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. के के ग्रँड या चेंबुरमधील इमारतीत 11 व्या मजल्यावर सूरज चव्हाण राहतात. ईडीचे पाच अधिकारी सूरज चव्हाण यांच्या घरी दाखल झाले होते.

अशातच आता कोविड सेंटर कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सुरज चव्हाण यांना समन्स बजावले आहे. तसेच सोमवारी (26 जून) चौकशीला ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना या समन्समधून देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Monsoon : प्रतीक्षा संपली! पावसाच्या स्वागतासाठी देश तयार; ‘या’ राज्यांना मिळणार दिलासा)

बुधवारी सकाळी ईडीने कारवाईस सुरुवात केली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सूरज चव्हाण यांच्या घर तसेच कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल, महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरीदेखील ईडीचे पथक धडकले. या धाडसत्रामुळे एकच खळबळ उडाली होती.

ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आले, ज्यामध्ये वैद्यकीय साहित्य आणि सेवा पुरवण्याचे सब टेंडर होते. असं टेंडरशी संबंध सुरज चव्हाण यांचा येतो, त्यामुळे या संपूर्ण कंत्राटामध्ये आर्थिक व्यवहार होताना नियमांची उल्लंघन झालं का? यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार करण्यात आला का? या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणात लावण्यात आलेले आरोप
  • आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट
  • करारासाठी बनावट कागदपत्रे सादर
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकल्याची माहिती कंपनीने लपविली
  • 100 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप
  • 38 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.