मुंबईकरांनो… कडाक्याच्या थंडीत बाहेर पडताय? अशी घ्या काळजी

115

रविवारपासून मुंबईत गारठा वाढला असताना वाळूच्या धूलिकणांनी सोमवारी धोकादायक पातळीचा उच्चांक गाठला. मुंबईत हवेची गुणवत्ता अतिधोकादायक पातळीवर आजही आढळून आली. मुंबईतील हवेची गुणवत्ता ५०२ वर पोहोचल्याने आजही मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. देशभरात मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेने धोक्याची पातळी ओलांडली. त्या खालोखाल पुणे आणि अहमदाबादची हवा बिघडली.

मुंबईत सोमवारी किमान तापमान थेट सहा अंशाने खाली सरकत १५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. रविवाच्या धूलिकणांच्या प्रभावात मुंबईतील धूलिकण आणि सूक्ष्म धूलिकण दोघांमध्येही वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता जास्त ढासळल्याची माहिती सफर या प्रणालीतून दिली गेली. सफर ही मुंबई वेधशाळा आणि पुण्यातील आयआयटीएम या केंद्रीय पृथ्वी व विज्ञान शाखेच्यावतीने बनवलेल्या प्रणालीत मुंबईतील विविध ठिकाणांच्या धूलिकणांच्या प्रमाणाबाबत माहिती दिली जाते.

सोमवारचे मुंबईतील विविध भागांतील धूलिकणांची मात्रा

अतिधोकादायक ठिकाणे

  • बोरिवली – धूलिकण ४६८ तर सूक्ष्म धूलिकण ४०९
  • मालाड – धूलिकण४८० तर सूक्ष्म धूलिकण ४७४
  • भांडूप –   धूलिकण ४७८, सूक्ष्म धूलिकण ७९४
  • अंधेरी – धूलिकण – ९९३, सूक्ष्म धूलिकण – ४६०
  • वरळी – धूलिकण – ४२३, सूक्ष्म धूलिकण – ४२५
  • माझगाव – धूलिकण ५९०. सूक्ष्म धूलिकण – ६०८
  • कुलाबा – धूलिकण – ५४४, सूक्ष्म धूलिकण – ४४६

० पहाटे तसेच रात्री घराबाहेर शक्यतो जाऊ नका
० थंडीत बाहेर असताना अतिघाईचे काम करु नका
० घराबाहेर थोड्या अंतराचेच जाणे पसंत करा, लांब पल्ला चालून पार करायचा असल्यास अधूनमधून ब्रेक घेत रहा
० छातीत दुखायला लागल्यास, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यास, थकवा जाणवल्यास, चक्कर आल्यासारखे जाणवल्यास घरा बाहेर पडू नका
० घरातील खिडक्या बंद ठेवा
० घरातील एसी बंद ठेवा
० लाकूड किंवा मेणबत्त्या जाळणे टाळा, अशामुळे हवेत धूलिकणांची मात्रा वाढते
० घरात सुक्या कचरा काढण्यासाठी झाडूचा वापर करु नका, ओला फडक्याने साफसफाई करा
० घराबाहेर पडताना एन ९५ मास्क तोंडाला लावून बाहेर पडा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.