Ducati Scrambler Mach 2.0 : ७०च्या दशकातील वाटणारी ड्युकाटीची ‘ही’ रेट्रो बाईक

रेट्रो डिझाईनमुळे सहज लक्ष वेधून घेणारी ही बाईक आहे ९ लाख रुपयांची

264
Ducati Scrambler Mach 2.0 : ७०च्या दशकातील वाटणारी ड्युकाटीची ‘ही’ रेट्रो बाईक
Ducati Scrambler Mach 2.0 : ७०च्या दशकातील वाटणारी ड्युकाटीची ‘ही’ रेट्रो बाईक
  • ऋजुता लुकतुके

ड्युकाटी स्क्रँबलर मॅक २.० (Ducati Scrambler Mach 2.0) ही बाईक कंपनीने २०१७ मध्ये पहिल्यांदा भारतात लाँच केली होती. १९७०च्या दशकातील डिझायनिंग असलेली ही बाईक तेव्हा चांगलीच गाजली होती. आता कंपनीने मध्यम आकाराच्या आणि शक्तीच्या या बाईकमध्ये काळानुरुप काही बदल केले आहेत.

ड्युकाटीची स्क्रँबलर रेंज आयकॉन बाईकपासून सुरू होते. पण, यात मॅक २.० हे व्हर्जन अपडेटेड आहे. ही बाईक बघितल्यावर तुमचं लक्ष गाडीच्या इंधनाच्या टाकीकडे जातं. यावर एक रंगसंगती आहे, जी लक्ष वेधून घेते. डयुकाटी कंपनीच्याच २०१७ च्या एका हेलमेट सीरिजवर ही रंगसंगती पहिल्यांदा होती. आणि त्यांनी ती तेव्हाच बाईकमध्येही वापरली होती. या जुन्या लुकवरच नवीन ड्युकाटी स्क्रँबलर मॅक आधारित आहे. स्क्रँबलरची तेव्हाची जाहिरात तुम्ही इथं पाहू शकता.

(हेही वाचा – BMC Chief Engineer Post : मुंबई महापालिकेतील १५ प्रमुख अभियंत्यांची पदे रिक्त, प्रशासकांनी असाही नोंदवला महापालिकेत इतिहास)

१९७० मध्ये अमेरिकेतील रोलँड सँड्स या बाईक डिझायनरच्या गाड्यांना अशी रंगसंगती असायची. तोच रेट्रो लुक ड्युकाटीच्या या बाईकला आहे. नवीन गाडीत हँडलबारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. हे हँडल बार आणि त्याचा डिस्प्ले आयकॉन तसंच इतर ड्युकाटी गाड्‌यांपेक्षा मोठा आहे. तसंच हे हँडल थोडं खाली आहे. त्यामुळे तुमचे हातही चालवताना खाली राहतात. आणि त्यामुळे वेगाने गाडी चालवताना तुम्हाला वाऱ्याचा अवरोध थोडा कमी जाणवतो, असा कंपनीचा दावा आहे.

ड्युकाटीचं एल ट्विन इंजीन या गाडीतही आहे. गाडीचे ब्रेक्स हे सगळ्यात सुरक्षित मानले जातात. शहरांत सुरक्षित हायवेज आणि थोड्याफार खडकाळ रस्त्यांवर चालवायला सुरक्षित अशी ही बाईक आहे. या बाईकची किंमत भारतात ९ लाख रुपयांपासून सुरू होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.