BMC Chief Engineer Post : मुंबई महापालिकेतील १५ प्रमुख अभियंत्यांची पदे रिक्त, प्रशासकांनी असाही नोंदवला महापालिकेत इतिहास

4851
BMC : मुंबई महापालिका आणखी २५०० संगणकांची करणार खरेदी
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिकेमध्ये सध्या प्रशासकांची राजवट असून कधी नव्हे ते महापालिकेतील १५ खात्यांचे व विभागाचे प्रमुख अभियंता पद ही प्रभारीच आहे. या सर्व पदांवर अद्यापही कायम प्रमुख अभियंत्यांची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे महत्वाची अशी प्रमुख अभियंत्यांची सर्वच पदे रिक्तच आहे. या पदांचा तात्पुरता भार हा उपप्रमुख अभियंत्यावर सोपवलेला आहे. मागील वर्षभरापासून ही पदांचा भार प्रभारी प्रमुख अभियंत्यांच्या हाती असतानाही प्रशासकांना या पदावर कायम प्रमुख अभियंत्यांची नेमणूक करता आलेली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल हे जाणीवपूर्वक आपल्या काही मर्जीतील उपप्रमुख अभियंत्यांवर प्रभारी प्रमुख अभियंता पदाचा भार सोपवून आपल्याला हवे तसे कामकाम करून घेताना सेवाज्येष्ठ उपप्रमुख अभियंत्यांना डावलण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या इतिहासात सर्वच प्रमुख अभियंत्यांची पदे रिक्त राहण्याची ही पहिलीच वेळ असून आयुक्त तथा प्रशासकांनी या नव्या इतिहासाची नोंद महापालिकेत केली आहे. (BMC Chief Engineer Post)

मुंबईत विविधे सेवा सुविधा आणि पायाभूत प्रकल्प राबवल्या जाणाऱ्या विभागांना आता कायम प्रमुख अभियंता नसून एकप्रकारे या पदांवर प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक करून अतिरिक्त आयुक्तांनी आपपल्या हाती कारभार ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिका अस्तित्वात नसताना आणि सर्व अधिकारी प्रशासकांच्या हाती असताना अशाप्रकारे पदे रिक्त ठेवून त्यावर प्रभारी म्हणून उपप्रमुखांना बसवून त्यांच्याकडून फक्त आपल्याला अपेक्षित अशी कामे करून घेण्याचा प्रयत्न प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. (BMC Chief Engineer Post)

(हेही वाचा – Justice Ajay Khanwilkar : देशाचे पहिले लोकपाल बनले न्यायमूर्ती अजय खानविलकर)

विकास व नियोजन विभाग, इमारत देखभाल विभाग, नगर अभियंता ,नागरी प्रशिक्षण केंद्र, रस्ते व वाहतूक विभाग, कोस्टल रोड ,पूल विभाग, यांत्रिक व विद्युत विभाग, पर्जन्य जलवाहिनी, जलअभियंता विभाग, पाणी पुरवठा प्रकल्प, मलनि:सारण प्रकल्प, मुंबई मलनि:सारण प्रकल्प, मलनि:सारण प्रचालन, घनकचरा व्यवस्थापन आदींचे प्रमुख अभियंता पद हे मागील एक ते दीड वर्षांपासून रिक्त असून या पदावर कायम अधिकाऱ्याची नेमणूक करण्याऐवजी प्रशासन आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला प्रभारी म्हणून नेमून काम करून घेत आहे. मुंबई महापालिकेच्या खात्यांच्यावतीने हजारो कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून जर भविष्यात कोणत्याही प्रकारचा आरोप किंवा गैरव्यवहार झाल्यास त्याला प्रभारी प्रमुख अभियंत्यांना जबाबदार कसे धरले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करण्यासाठी कायम पद निर्माण करणे आवश्यक असते. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक ही पदे न भरता आपला हेतू साध्य करून घेण्याचा प्रयत्न असल्याची चर्चाच अभियंत्यांमधून ऐकू येत आहे. जर प्रभारी प्रमुख अभियंत्याला कोणतेही अधिकार नसल्याने पद रिक्त राहू नये म्हणून तात्पुरता पदभार सोपवला जातो, त्याला विभागाच्या कामकाजाची सोय पाहिली जाते, पण त्या प्रभारी अधिकाऱ्यावर प्रशासनातील अधिकारी हे जबाबदारी निश्चित करू शकत नाही. पण जर अधिकाऱ्याची कायम नेमणूक केल्यास संबंधित अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याचे ऐकत नाही किंवा नियमांवर बोट ठेवून काम करतो त्यामुळे ही पदे न भरता प्रभारींकडे सोपवली जातात. त्यामुळे बरेच प्रभारी प्रमुख अभियंता हे अधिकाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी आणि त्यांना खुश ठेवून आपले पद कायम राखण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC Chief Engineer Post)

प्रभारी प्रमुख अभियंता पदावरील अधिकारी

विकास व नियोजन विभाग: सुनील राठोड

इमारत देखभाल विभाग: यतीन दळवी

नगर अभियंता : दिलीप पाटील

नागरी प्रशिक्षण केंद्र : सुनील भाट

रस्ते व वाहतूक विभाग : मनिष पटेल

कोस्टल रोड : मांतय्या मल्लया स्वामी

पूल विभाग : विवेक कल्याणकर

यांत्रिक व विद्युत विभाग : कृष्णा पेरेकर

पर्जन्य जलवाहिनी : संदीप कांबळे (१ फेब्रुवारीला सेवा निवृत्त)

जलअभियंता विभाग : पुरुषोत्तम माळवदे

पाणी पुरवठा प्रकल्प : पांडुरुंग बंडगर

मलनि:सारण प्रकल्प : रिक्त

मुंबई मलनि:सारण प्रकल्प : अशोक मेंगडे

मलनि:सारण प्रचालन : प्रदीप गवळी

घनकचरा व्यवस्थापन : प्रशांत तायशेटे

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.