Haldwani Madarsa Demolition : आतापर्यंत ४ ते ६ जणांचा मृत्यू तर १०० पेक्षा अधिक पोलीस जखमी

मदरसा आणि नमाजची जागा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महापालिकेने तीन एकर जागा अतिक्रमणमुक्त करून मदरसा व नमाजची जागा सील केली होती. गुरुवारी ते पाडण्यात आले, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे.

337
Haldwani Madarsa Demolition : आतापर्यंत ४ ते ६ जणांचा मृत्यू तर १०० पेक्षा अधिक पोलीस जखमी

उत्तराखंडमधील हल्दवानी (Haldwani Madarsa Demolition) महापालिकेने गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी अवैध मदरसा बुलडोझरने जमीनदोस्त केला. याच ठिकाणी नमाज पठणासाठी इमारत बांधली जात होती, तीही या कारवाईत पाडण्यात आली.

या वेळी बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या पथकावर मुसलमानांनी (Haldwani Madarsa Demolition) दगडफेक केली. धर्मांधांनी बांभूळपुरा पोलीस ठाण्याला चारही बाजूंनी घेरले आणि दगडफेक केली. अनेक वाहने जाळली. या वेळी झालेल्या जाळपोळीमुळे ट्रान्सफॉर्मरलाही आग लागली.

(हेही वाचा – Justice Ajay Khanwilkar : देशाचे पहिले लोकपाल बनले न्यायमूर्ती अजय खानविलकर)

आतापर्यंत ४ ते ६ जणांचा मृत्यू तर १०० पेक्षा अधिक पोलीस जखमी –

दरम्यान हल्द्वानी (Haldwani Madarsa Demolition) येथे घडलेल्या घटनेत आतापर्यंत ४ ते ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले आहेत. तसेच अजूनही शहरातील इंटरनेट सेवा बंदच आहे. शहरातील सर्व शाळा आणि कॉलेजला प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Abhishek Ghosalkar : मॉरिसच्या पीएसह एका व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात)

जागा पूर्णपणे बेकायदेशीर – महापालिका आयुक्त

‘मदरसा (Madrasa) आणि नमाजची जागा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महापालिकेने तीन एकर जागा अतिक्रमणमुक्त करून मदरसा व नमाजची जागा सील केली होती. गुरुवारी ते पाडण्यात आले’, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक आणि पोलिस आणि गुप्तचर विभागाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. दोषींवर (Haldwani Madarsa Demolition) कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.