Namo – The Grand Central Park : “द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क” ओळखले जाणार “नमो- द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क” नावाने – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण उद्यानाची पाहणी केली. त्यातील संकल्पनेवर आधारित विविध देशांची उद्याने, लहान मुलांसाठी असलेली खेळणी, जागा यांची पाहणी केली. क्यू आर कोड स्कॅन करून झाडाविषयी माहितीही जाणून घेतली.

355
Namo - The Grand Central Park : "द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क" ओळखले जाणार "नमो- द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क" नावाने - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची ठरेल, अशी ग्रॅण्ड सेंट्रल पार्क (Namo – The Grand Central Park) ही संकल्पना ठाण्यात प्रथमच साकारली आहे. हे उद्यान आबालवृद्धाना आनंद देणारे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी (८ फेब्रुवारी) ठाण्यात केले. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या आणि कल्पतरू समूहाने विकसित केलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचे लोकार्पण संपन्न झाले. हे “द ग्रॅंड सेंट्रल पार्क” आता “ नमो- द ग्रॅंड सेंट्रल पार्क” (Namo – The Grand Central Park) या नावाने ओळखले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

आमदार संजय केळकर यांनी सुचविल्याप्रमाणे या उद्यानाला, जगभरात ज्यांनी देशाचा नावलौकिक वाढवला आहे, असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात येईल. त्यामुळे या उद्यानाची ओळख ‘नमो द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क’ (Namo – The Grand Central Park) अशी होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकार्पण सोहळ्यात जाहीर केले.

(हेही वाचा – Justice Ajay Khanwilkar : देशाचे पहिले लोकपाल बनले न्यायमूर्ती अजय खानविलकर)

ग्रॅण्ड सेंट्रल पार्कच्या लोकार्पण सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित –

ठाणे महापालिका क्षेत्रात कोलशेत भागात २०.५ एकर जागेवर साकारलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कच्या लोकार्पण सोहळ्यास (Namo – The Grand Central Park) शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, एच. एस. पाटील, मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक संजय वाघुले, संदीप लेले, उषा भोईर, भूषण भोईर, सिद्धार्थ ओवळेकर, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मिताली संचेती, कल्पतरू डेव्हल्पर्सचे मोफतराज मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा – Abhishek Ghosalkar : मॉरिसच्या पीएसह एका व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात)

मुख्यमंत्र्यांकडून सेंट्रल पार्कची पाहणी –

लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण उद्यानाची (Namo – The Grand Central Park) पाहणी केली. त्यातील संकल्पनेवर आधारित विविध देशांची उद्याने, लहान मुलांसाठी असलेली खेळणी, जागा यांची पाहणी केली. क्यू आर कोड स्कॅन करून झाडाविषयी माहितीही जाणून घेतली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?

राज्यातील हे सगळ्यात मोठे उद्यान (Namo – The Grand Central Park) आहे. त्याच्या उभारणीत कुठेही गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही. सुमारे ३ हजार ५०० झाडे या उद्यानात आहेत. आणखी झाडांचे नियोजन करावे. तसेच, त्याचे व्यवस्थापनही नेटकेपणाने व्हावे. कल्पतरू डेव्हल्पर्सने टीडीआरच्या माध्यमातून हे उभे केले आहे. महापालिकेचा एकही पैसा खर्च न करता हे भव्य दिव्य उद्यान उभे राहिले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा – BMC Chief Engineer Post : मुंबई महापालिकेतील १५ प्रमुख अभियंत्यांची पदे रिक्त, प्रशासकांनी असाही नोंदवला महापालिकेत इतिहास)

मिनिएचर पार्क –

अर्बन फॉरेस्ट कसे असू शकते याचे हे उत्तम उदाहरण (Namo – The Grand Central Park) आहे. हे ऑक्सिजन पार्क आहे. यामधून कारंजे तलाव यांचा अनुभव सगळ्यांना घेता येईल. त्याच जोडीने मिनिएचर पार्क उभे करण्यात येणार आहे. त्यात जगभरातील आश्चर्यांच्या मोठ्या प्रतिकृती येथे पाहता येतील. सगळ्यांनाच परदेशात जाता येत नाही. त्यामुळे त्यांनाही तो आनंद या मिनिएचर पार्कमध्ये घेता येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

सेंट्रल पार्क भव्य दिव्य (Namo – The Grand Central Park) झाले असून हे उत्तम पर्यटन स्थळ होईल, असा विश्वास याप्रसंगी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. तसेच, या उद्यानाचे नामकरण नमो ग्रॅण्ड सेंट्रल पार्क असे करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. (Namo – The Grand Central Park)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.