Chandrayaan-4 : चांद्रयान-4 मोहिम दोन टप्प्यात प्रक्षेपित होणार – एस. सोमनाथ

Chandrayaan-4: चांद्रयान-4 मोहीम केवळ चंद्राच्या पृष्ठभागावरच उतरणार नाही, तर तेथून काही नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल.

136

चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या ऐतिहासीक यशासनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) चांद्रयान-4 मोहिमेच्या (Chandrayaan-4) तयारीत आहे. ही महिम 2 टप्प्यात प्रक्षेपित होणार असल्याचे प्रतिपादन इस्त्रो प्रमुख एस. सोमनात (S. Somanat) यांनी एका कार्यक्रमात केले.

(हेही वाचा- Sandeshkhali : टीएमसीच्या राज्यात महिलांवर अत्याचार; मोदींनी घेतली संदेशखालीच्या पिडीत महिलांची भेट)

चांद्रयान-4 मोहीम (Chandrayaan-4) केवळ चंद्राच्या पृष्ठभागावरच उतरणार नाही, तर तेथून काही नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) एकाच टप्प्यात प्रक्षेपित करण्यात आले होते. परंतु, चांद्रयान- 4 दोन टप्प्यात प्रक्षेपित होणार आहे. दोन स्वतंत्र प्रक्षेपण चांद्रयान- 4 वाहन घेऊन जातील.चांद्रयान- 4 (Chandrayaan-4) मोहिमेत 5 अंतराळयान मॉड्यूल समाविष्ट केले जातील. तसेच, 2 रॉकेटच्या मदतीने दोन टप्प्यात प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान- 4 (Chandrayaan-4) मध्ये केवळ चांद्रयान- 3 मिशनप्रमाणे लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल नसतील तर दोन अतिरिक्त मॉड्यूल देखील असतील. हे दोन मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरील काही नमुने घेऊन पृथ्वीवर परत येतील. चांद्रयान-4 (Chandrayaan-4) पहिल्या टप्प्यात पृथ्वीवरून प्रक्षेपित होणार आहे. यानंतर ते चंद्रावर उतरेल. चंद्रावरील सर्व कामे पूर्ण केल्यानंतर, ते पृथ्वीवर नमुने वितरीत करण्यासाठी प्रक्षेपित केले जाईल. प्रथमच प्रक्षेपणाच्या वेळी, चांद्रयान-4 (Chandrayaan-4) चे एकूण वजन 5200 किलोग्रॅम असेल, तर जेव्हा चंद्रावरून पृथ्वीच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल तेव्हा त्याचे वजन 1527 किलो इतके ठेवले जाईल.चांद्रयान-4 (Chandrayaan-4) स्वतःसोबत पाच मॉड्यूल्स घेऊन जाईल. त्यात एसेन्डर मॉड्यूल, डिसेंडर मॉड्यूल, प्रोपल्शन मॉड्यूल, ट्रान्सफर मॉड्यूल आणि रीएंट्री मॉड्यूल असेल. प्रत्येक मॉड्यूलचे कार्य वेगळे असेल. भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन एलव्हीएम-3 तीन घटकांसह लॉन्च केले जाईल, ज्यामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल, डिसेंडर मॉड्यूल आणि एसेंडर मॉड्यूलचा समावेश असेल.

(हेही वाचा- Sandeshkhali : टीएमसीच्या राज्यात महिलांवर अत्याचार; मोदींनी घेतली संदेशखालीच्या पिडीत महिलांची भेट)

चांद्रयान-4 (Chandrayaan-4) मिशन अंतर्गत प्रोपल्शन मॉड्यूल- चांद्रयान-3 मोहीम प्रमाणे, प्रोपल्शन मॉड्यूल चांद्रयान-4 ला चंद्राच्या कक्षेत नेईल. डिसेंडर मॉड्यूल- हे मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, जसे चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मिशनचे विक्रम लँडर चंद्रावर उतरले होते. असेंडर मॉड्यूल- चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा केल्यानंतर ॲसेंडर मॉड्यूल लँडरपासून वेगळे होईल. ट्रान्सफर मॉड्यूल- हे मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरून असेंडर मॉड्यूल घेईल आणि चंद्राच्या कक्षेतून बाहेर येईल. हे मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरून घेतलेले नमुने पृथ्वीवर परत आणेल.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.