Sandeshkhali : टीएमसीच्या राज्यात महिलांवर अत्याचार; मोदींनी घेतली संदेशखालीच्या पिडीत महिलांची भेट

91
Sandeshkhali : टीएमसीच्या राज्यात महिलांवर अत्याचार; मोदींनी घेतली संदेशखालीच्या पिडीत महिलांची भेट
Sandeshkhali : टीएमसीच्या राज्यात महिलांवर अत्याचार; मोदींनी घेतली संदेशखालीच्या पिडीत महिलांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांनी संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी महिलांनी आपल्या यातना कथन केल्याचे भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी सांगितले. (Sandeshkhali)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज, बुधवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधानांनी उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील बशीरहाटमध्ये एका सभेला संबोधित केले. सध्या चर्चेत असलेले संदेशखाली हे ठिकाणही याच जिल्ह्यात येते. यावेळी मोदींनी या दौऱ्यात संदेखालीतल्या पीडित महिलांची भेट घेतली. संदेशखालीतील पीडित महिलांनी मोदींकडे आपली व्यथा मांडली. पंतप्रधानांनी त्यांच्या वेदना जाणून घेतल्याची माहिती अग्निमित्रा पॉल यांनी दिली. (Sandeshkhali)

(हेही वाचा- Lok Adalat : प्रलंबित प्रकरणे निकाली काढून ठाणे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर)

पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली इथल्या महिलांवर झालेल्या अत्याचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. टीएमसीच्या राज्यात माता-भगिनींवर अत्याचार झाले असून राज्य सरकार गुंडांना पाठिशी घालत असल्याची टीका पंतप्रधानांनी केले. ते बुधवारी राज्यातील बशीरहाट येथे एका सभेला संबोधित करीत होते. (Sandeshkhali)

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, संदेशखालीत घडलेला प्रकार पाहून कुणाचीही मान शरमेने खाली जाईल. पण, राज्य सरकारला काहीही फरक पडत नाही. तृणमूल सरकार (Trinamool Congress) आरोपींना वाचवण्यासाठी सर्वप्रकारच्या बळ पणाला लावताना दिसत आहे. ममता बॅनर्जींच्या राजवटीत घोर पाप झाले आहे. टीएमसीचे नेते ठिकठिकाणी महिलांवर आणि लहान मुलींवर अत्याचार करत आहेत. अशी प्रकरणे घडत असताना, तृणमूल काँग्रेसचा (Trinamool Congress) त्यांच्या नेत्यांवर विश्वास आहे, पण माता-भगिनींवर विश्वास नाही. त्यामुळेच येथील माता-भगिनींमध्ये प्रचंड रोष असल्याचे मोदी म्हणाले. तृणमूल काँग्रेसची माफिया राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी राज्यातील माता-भगिनी आता पुढे सरसावल्या आहेत. टीएमसी सरकार कधीही महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही अशी भावना आता त्यांच्यातही जागृत झाली आहे. त्यामुळे त्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी माता-भगिनीच त्यांना धडा शिकवतील असा इशारा पंतप्रधानांनी दिला. (Sandeshkhali)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : फडणवीसांसह भाजपा नेते दिल्लीला रवाना)

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आपल्या अत्याचारी नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. याउलट एनडीए सरकारने बलात्काराच्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूदही केली आहे. आमच्या सरकारने महिलांसाठी हेल्पलाइन तयार केली आहे. पण तृणमूल सरकार बंगालमध्ये त्याची अंमलबजावणी करू देत नाही. तृणमूल सरकार महिलांचे कधीही भले करू शकत नाही. पण आता टीएमसीची माफिया राजवट संपवण्यासाठी महिला शक्ती एकवटली आहे आणि ती नक्कीच यांचा सत्ता उलथवून टाकेल असे मोदींनी सांगितले. (Sandeshkhali)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.