तूर, कापूस, मका त्याच्या मधोमध गांजा; शेतकऱ्याला झाली अशी सजा!

90

शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावाच्या शिवारातील शेताच्या मधोमध शेतक-यांनी गांजा लावला असल्याची पक्की खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर या पथकाने शेतावर छापा मारला. शेतात तब्बल १४ लाखांहून अधिक रकमेचा गांजा लावल्याचे आढळून आले. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(हेही वाचा – वन मॅन शो! संचालक मंडळ बरखास्त, आता एलॉन मस्क स्वत: बनणार ट्विटरचे CEO!)

शिरपूर तालुक्यात शेतांमध्ये गांजा लावण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाई केल्या जातात तरी देखील शेतांमध्ये गांजाचे उत्पादन घेण्याचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही. लाकड्या हनुमान गावाच्या शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. एलसीबीने शेतात छापा मारला असता शेतात तूर, मका व कापूस या पिकांच्या मध्यभागी गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. ३ ते ६ फूट उंचीची ७२१ किलो. ४०० ग्रॅम वजनाची १४ लाख ४२ हजार ८०० रूपयांची गांजाची झाडे स्थानिक गुन्हे शाखेखे पथकाने जप्त केली असून मोहन पावरा, भावसिंग पावरा यांना ताब्यात घेतले आहे.

अमली पदार्था गांजाला मागणी जास्त असल्याने अवैध रित्या गांजाच्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर तस्करीचे प्रमाण वाढले आहे. महेंद्र देवराम सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला दोघांविरूध्द गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनो व्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.