Buddha Purnima : बुद्धं शरणं गच्छामि; असे घडले गौतम बुद्ध

बुद्ध हे नाव नसून ही एक उपाधी आहे. बुद्ध म्हणजे बुद्धिमान, ज्ञानी होय.

113
Buddha Purnima : बुद्धं शरणं गच्छामि; असे घडले गौतम बुद्ध

गुरुवार, २३ मे म्हणजेच बुद्ध पौर्णिमा… बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला. नेपाळमधले लुम्बिनी येथले शाक्य राजा शुद्धोधन आणि राणी महामाया म्हणजेच माया देवी यांच्याकडे एका गोंडस मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव सिद्धार्थ असं ठेवण्यात आलं. सिद्धार्थच्या जन्मानंतर अवघ्या सात दिवसांतच राणी माया देवी यांना देवाज्ञा झाली. (Buddha Purnima)

त्यावेळी राजा शुद्धोधन यांनी सिद्धार्थची मावशी महाप्रजापती गौतमी हिच्याशी लग्न केलं. गौतमीने अतिशय प्रेमाने सिद्धार्थचा सांभाळ केला. म्हणूनच सिद्धार्थला गौतम या नावानेही ओळखलं जातं. सिद्धार्थला योग्य ते सर्व शिक्षण देण्यात आलं. कालांतराने सिद्धार्थचं लग्न यशोधरा नावाच्या एका सुंदर राजकन्येशी लावून देण्यात आलं. त्या दाम्पत्याला राहुल नावाचा मुलगा झाला. हिंदू धर्मातल्या मान्यतेनुसार गौतम बुद्ध हे श्रीहरी विष्णूंच्या दहा अवतारांपैकी नववा अवतार आहेत असं मानलं जातं. (Buddha Purnima)

राजघराण्यात सिद्धार्थचा जन्म झाला होता. त्यामुळे त्यांचं आयुष्य अतिशय वैभवात चाललेलं होतं. त्यांची मावशी आणि सावत्र आई गौतमी हिने अतिशय प्रेमाने त्यांचा सांभाळ केला. त्यांना हवे नको ते सगळं पाहिलं. त्यांच्या अवतीभवती सतत नोकरचाकर दिमतीला उभे असायचे. राजा शुद्धोधन यांनी कोणत्याही प्रकारच्या दुःखाची सावलीसुद्धा सिद्धार्थपर्यंत पोहोचू दिली नव्हती. सिद्धार्थने चक्रवर्ती सम्राट व्हावे अशी त्यांची ईच्छा होती. (Buddha Purnima)

(हेही वाचा – मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा पूर्वनियोजित कट होता?; Pravin Darekar यांचा कीर्तिकरांवर गंभीर आरोप)

यामुळे सिद्धार्थ यांनी घेतला संन्यास

वयाच्या एकोणतीसाव्या वर्षांपर्यंत सिद्धार्थ यांचं आयुष्य अतिशय सुरळीत, सुखात आणि राजवैभवात आनंदी चाललं होतं. पण एक दिवस सिद्धार्थला नगराबाहेर फेरफटका मारायला जावसं वाटलं. त्यासाठी ते रथात चढले. सारथीने त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सारथीला मागे बसवून सिद्धार्थ स्वतःच रथ चालवत निघाले. (Buddha Purnima)

त्यावेळी त्यांना मानवी आयुष्याचं कधीही न पाहिलेलं सत्य समोर दिसलं. आजारी व्यक्ती, जर्जर वृद्धत्व असलेली व्यक्ती आणि एक प्रेतयात्रा त्यांनी पाहिली. या जीवनात किती दुःख असतं ते त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं. पुढे त्यांना एक संन्यासी दिसला. त्यांना पाहून सिद्धार्थ यांनी सर्व सुखांचा त्याग करून संन्यास घ्यायचं ठरवलं. त्यासाठी एका रात्री ते कोणालाही न सांगता घराबाहेर पडले. (Buddha Purnima)

(हेही वाचा – Punjab: दहशतवादी पन्नूने मोदींच्या प्रचारसभेआधी केला खळबळजनक दावा, म्हणाला…)

बुद्ध म्हणजे बुद्धिमान

ज्ञानाच्या शोधत सिद्धार्थ सगळीकडे भटकू लागले. त्यांनी संन्यास घेतल्यामुळे त्यांच्या शरीराची अवस्था अतिशय कमकुवत झाली होती. पण कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की, या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे शक्य नाही. ज्ञानप्राप्तीसाठी शरीर हे महत्वाचं साधन आहे. म्हणून त्यांनी संन्यास सोडून ध्यानाचा मार्ग अवलंबला. ते शरीराच्या गराजेपुरतेच अन्न ग्रहण करू लागले. (Buddha Purnima)

एक दिवस ते बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली तपस्येला बसले. ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय उठायचं नाही असं त्यांनी ठरवलं. असं करता करता एकोणपन्नास दिवस निघून गेले. त्यानंतर सिद्धार्थच्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांना त्या पिंपळवृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली. पुढे त्यांना बुद्ध या नावाने लोक ओळखायला लागले. बुद्ध हे नाव नसून ही एक उपाधी आहे. बुद्ध म्हणजे बुद्धिमान, ज्ञानी होय. (Buddha Purnima)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.