Punjab: दहशतवादी पन्नूने मोदींच्या प्रचारसभेआधी केला खळबळजनक दावा, म्हणाला…

या इमारतीची मालकी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले भारत इंदर सिंग चहल यांच्याकडे आहे.

175
Punjab: दहशतवादी पन्नूने मोदींच्या प्रचारसभेआधी केला खळबळजनक दावा, म्हणाला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पटियाला दौऱ्याच्या एक दिवस आधी, रॅलीच्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर असलेल्या इमारतीवर खलिस्तानींनी त्यांचा ध्वज फडकवलेला आढळला. त्यावर त्यांनी खलिस्तानी घोषणा लिहिलेली होती. या घटनेविरोधात पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. दरम्यान, मिरवणुकीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ( Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu)

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २३ मे रोजी प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. मिनी सचिवालय रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत ध्वज फडकवण्यात आला. या इमारतीची मालकी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले भारत इंदर सिंग चहल यांच्याकडे आहे. जुन्या बस स्थानकाच्या पुलावर खलिस्तानची घोषणा लिहिली होती. प्रवाशांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

(हेही वाचा –इन्कम टॅक्स रिटर्न घोटाळा प्रकरणी पुरुषोत्तम चव्हाणला ED कडून अटक )

व्हायरल व्हिडिओमध्ये पन्नू म्हणाला…
यानंतर दहशतवादी पन्नूचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दहशतवादी पन्नूने म्हटले आहे की, मोदी पंजाबमध्ये आल्यावर स्थानिक खलिस्तानी समर्थक त्यांना लक्ष्य करतील. कारण हजारो शीख शेतकरी आणि निज्जरांच्या हत्येसाठी मोदी जबाबदार आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पन्नू म्हणाले की, खलिस्तानी समर्थकांना मोदींच्या पंजाब दौऱ्याची आणि मार्ग आराखड्याची संपूर्ण माहिती पंजाबच्या भगवंत मान सरकारकडून मिळाली आहे.

सुरक्षा वाढवली
पटियाला परिक्षेत्राचे डी. आय. जी. हरचरण सिंग भुल्लर म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी केली जात आहे. ध्वज ताब्यात घेतल्यामुळे रॅलीच्या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.