रस्त्यावरून चालता चालता निकिता दत्ताचा आयफोन गेला चोरीला

74
बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्ता हीच महागडा आय फोन ११ हा मोबाईल चोरांनी तिच्या हातातून हिसकावून चोरी केला असल्याची घटना वांद्रे पश्चिम पाली हिल परिसरात घडली. निकिता ही सायंकाळी घरातून वॉकिंगला जाण्यासाठी निघाली असता ही घटना घडली आहे. मोबाईल फोनमध्ये महत्वाचे मोबाईल क्रमांक, बँकांची माहिती असल्यामुळे निकिता दु:खी झाली. निकिताचा मोबाईल फोन चोरणाऱ्यांच्या शोधासाठी वांद्रे पोलिसांचे एका पथक परिसरात सीसीटीव्ही शोधत आहे.

दोन चोरांनी चोरला मोबाईल

बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्ता ही वांद्रे ३६वा रोड पाली हिल परिसरात राहत आहे. अनेक हिंदी चित्रपट आणि ओटीटीवर काम करणारी निकिता दत्ता ही रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरातून वॉकिंगसाठी निघाली होती. या दरम्यान अग्रवाल नर्सिंग होम २९ वा रस्ता या ठिकाणी पाठी मागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांपॆकी मागे बसलेल्या एकाने निकिताच्या हातातील आय फोन ११ हा मोबाईल फोन हिसकावून पोबारा केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळलेल्या निकिताने चोर चोर म्हणून ओरडली मात्र तोपर्यत हे दोघे मोबाईल चोर पळून गेले होते. अखेर तिने वांद्रे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून मोबाईल चोरांच्या शोधासाठी परिसरात सीसीटीव्ही ताब्यात घेऊन ते तपासण्याचे काम सुरु आहे. निकिताने पोलिसांना मोबाईल फोन शोधून देण्याची विनंती केली असून तिच्या मोबाईलमध्ये महत्वाची माहिती आणि काही महत्वाचे क्रमांक आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.