मुंबईत ३६ कोटींमध्ये काळ्याचे पांढरे!

101

मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक सिंग्नलच्या ठिकाणी पादचाऱ्यांना चालता यावं यासाठी महापालिकेच्यावतीने झेब्रा क्रॉसिंग तसेच रस्त्यांवर लेन मार्किंग केली जाते. मुंबईच्या रस्त्यांवर आजवर अशाप्रकारच्या रस्त्यांवरील रंगरंगोटीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी रस्त्यांवर पांढरे पट्टे दुसऱ्या दिवशीही दिसत नाही. त्यामुळे कायमस्वरुपी टिकणाऱ्या पांढऱ्या रंगाचा वापर होणे अपेक्षित असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे दरवर्षी यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असून याही वर्षी मुंबईतील सात परिमंडळांसाठी कंत्राटदारांची नेमणूक करून त्यावर तब्बल ३६ कोटी रुपये खर्च करून काळ्याचे पांढरे केले जाणार आहे.

रस्त्यांवरील रंग हा जास्तीत जास्त १५ दिवस टिकतो

मुंबईत सिमेंट कॉक्रिटसह डांबराचे रस्ते बनवले जात असताना त्यावर लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन ही थर्मोप्लास्टिक पेंटिंग केले जाते. परंतु कालांतराने यावरील थर्मोप्लास्टिक पेंटींग केलेल्या लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंगचा रंग उडून जातो आणि ते दिसत नाही. वाहनांना शिस्त आणि पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता पार करता यावा म्हणून हे रस्ते पेंटींग केले जात असले तरी रस्त्यांवर फासलेला रंग हा जास्तीत जास्त १५ दिवसांच्या पुढे टिकत नाही. मात्र, या पुसलेल्या पट्टयांच्या ठिकाणी पुन्हा रंगरंगोटी करण्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि वर्षांतून एकदाच कुठे तरी रस्त्यांवर काळे, पांढरे पट्टे दिसून येतात.

(हेही वाचा – गायक, संगीतकार ‘गोल्डन सिंगर’ बप्पी लहरी यांचं निधन )

महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २४ ते ३३ उणे दराने बोली

मात्र, दरवर्षी रस्त्यांवरील काळ्याचे पांढरे करण्याच्या नावार कोट्यवधी रुपये खर्च केले जात असून यंदाही प्रत्येक परिंमंडळांमधील महापालिकेच्या वॉर्डांमध्ये सरासरी ५ ते ६ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २४ ते ३३ उणे दराने बोली लावत काम मिळवले आहे. विशेष यंदापासून एकूण कामाच्या ८० टक्के रक्कम कंत्राटदारांना काम पूर्ण झाल्यावर दिले जाईल आणि उर्वरीत २० टक्के रक्कम ही दोन वर्षांच्या कालावधीमध्ये दिली जाणार आहे.

  • परिमंडळ १ : ४ कोटी २४ लाख (पी.ई.सी.सी), एकूण रस्ते-१२१
  • परिमंडळ २ : ६ कोटी ५३ लाख (आर.एस.कंस्ट्रक्शन), एकूण रस्ते-१८७
  • परिमंडळ ३ : ५ कोटी ७३ लाख (एम.एम. कंस्ट्रक्शन), एकूण रस्ते-१३३
  • परिमंडळ ४ :५ कोटी ५२ लाख (मेर्सस अस्फाल्ट इंडिया कॉर्पोरेशन), एकूण रस्ते-९७
  • परिमंडळ ५ : ६ कोटी ०८ लाख (मानश कंस्ट्रक्शन कंपनी), एकूण रस्ते-१२५
  • परिमंडळ ६: २ कोटी ५२ लाख (पी.ई.सी.सी), एकूण रस्ते-७६
  • परिमंडळ ७ : ४ कोटी ८४ लाख (एम.एम. कंस्ट्रक्शन), एकूण रस्ते-१०५

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.