बापरे! राज्यात इतक्या शाळा ‘अनधिकृत’! अशी ओळखा अनधिकृत शाळा

121

राज्यातील अनधिकृत शाळांवर सरकार लवकरच कारवाई करणार आहे. युडायस डेटानुसार राज्यात 674 शाळा अनधिकृत असल्याचे, निदर्शनास आले आहे. या शाळांपैकी किती शाळांना शासनाने परवानगी दिली आहे, याची खात्री करावी. तसेच ज्या शाळा अनधिकृत आहेत त्यांच्यावर आरटीई नियमानुसार तसेच शिक्षण विभाग शासन निर्णानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आदेश शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

असा चालू आहे कारभार

औरंगाबाद जिल्ह्यात तर मान्यता न घेताच अनेक संस्थाचालकांनी मोठ्या प्रमाणात शाळा सुरु केल्याचे, उघड झाले आहे. आरटीईचे नियम धाब्यावर बसवल्याने, या शाळांवर कारवाई केली जाणार आहे. आरटीईनुसार शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित महापालिकेची रीतसर मान्यता बंधनकारक असते. याशिवाय सीबीएसई शाळांना राज्य सरकराचे नाहरकत प्रमाण पत्र घेणे आवश्यक असते. तसेच, शिक्षण विभागाकडून आलेल्या जाहिरातीनुसार, संबंधित शिक्षण संस्थेमार्फत रीतसर अर्ज करावा लागतो. विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिका-यांमार्फत या अर्जाचा ठराव शासनाकडे पाठवण्यात येतो. बरेच संस्थाचालक मान्यतेपूर्वीच शाळा सुरु करुन, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात करतात.

( हेही वाचा: गायक, संगीतकार ‘गोल्डन सिंगर’ बप्पी लहरी यांचं निधन )

अशी ओळखा अनधिकृत शाळा

शासनाने प्रत्येक शाळेला युडायस नंबर दिलेला आहे. 11 अंकी असलेल्या या युडायस नंबरमध्ये सुरुवातीचे सहा अंक राज्य, जिल्हा आणि तालुका असे अनुक्रमे अंक दर्शवलेले असतात. त्यानंतरचे तीन अंक गाव अथवा वाॅर्ड, शेवटचे दोन अंक शाळा दर्शवतात. त्यामुळे पालकांनी मुलांचे प्रवेश घेण्याअगोदर शाळेची योग्य ती कागदपत्रे, युडायस नंबर तपासावा आणि नंतरच आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश घ्यावा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.