सरकारला विद्यार्थ्यांपेक्षा नगरसेवकांची चिंता, शाळा प्रत्यक्ष सुरू अन् महापालिकेच्या सभा मात्र ऑनलाईन!

83

मुंबईसह राज्यातील शाळा सुरू असताना सरकारला विद्यार्थ्यांपेक्षा नगरसेवकांची अधिक चिंता आहे. सर्व शाळा सुरू असताना महापालिकेच्या सर्व विशेष व वैधानिक सभांचे कामकाज प्रत्यक्ष घेण्याऐवजी या पुढे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभेसह इतर वैधानिक व विशेष सभांचे कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले आहेत.

वाढत्या संसर्गामुळे नव्याने निर्देश

मुंबईसह तसेच राज्यातील इतर भागात विशेषत: महानगरातही ओमायक्रॉनमुळे कोवीड- १९ संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन मोठ्या प्रमाणावरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने निर्बंध जारी केले आहेत. राज्यातील नागरी स्थानिक संस्थांच्या सभा प्रत्यक्ष उपस्थितीने घेण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले होते. परंतु, कोवीड-१९ च्या संक्रमीतात होत असलेली मोठी वाढ, शासनाच्या आदेशातील तरतूदी विचारात घेऊन राज्यातील महानगरपालिकांच्या सर्व बंधनकारक सभा/बैठकांबाबत नव्याने निर्देश देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – वाचा कशी आहे, सावित्रीबाईंच्या लेकीची पहिल्या शाळेची दुरावस्था)

महासभा, स्थायी समितीच्या बैठका ऑनलाईन होणार

ज्यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या महासभा, स्थायी समिती व इतर सर्व वैधानिक समित्यांच्या सर्व बंधनकारक बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगगव्दारे तथा ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात याव्यात, असे निर्देश नगरविकास खात्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या स्वाक्षरीने ३ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोविड १९ संक्रमण परिस्थितीचा आढावा १ महिन्यानंतर वस्तुस्थिती व तपशिलाच्या आधारे घेऊन या संदर्भातील पुढील निर्णय कळविण्यात येईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.