मुंबईत १० टक्के नाहीतर ३० टक्क्यांहून अधिक पाणीकपात

भाजपच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे कपात रद्द करण्याची मागणी

89

मुंबई महापालिकेने १० टक्के अधिकृत पाणीकपात घोषित केली असली तरी बहुतांश ठिकाणी ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी कपात होत असून डोंगर भागांत लोकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे या पाणी कपातीमुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. १० टक्के कपातीच्या नावाखाली मुंबईकरांच्या नळाचे पाणीच पळवण्याचा प्रकार होत असल्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा – SpiceJet मध्ये 18 दिवसांत 8 वेळा बिघाड, DGCA ने बजावली कारणे दाखवा नोटीस)

पाणी कपात रद्द करण्याची मागणी

याप्रकऱणी भाजपाच्या माजी नगरसेवक शिष्टमंडळाने माजी गटनेते प्रभाकर शिंदे व माजी पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली. मुंबई शहरात सुरु असलेल्या पाणी कपातीमुळे अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन भाजपा शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली.

लवकरात लवकर पाणी कपात होणार रद्द

इकबाल सिंह चहल यांनी या माजी नगरसेवकांच्या समस्या जाणून घेत या समस्येबाबतचा आढावा घेऊन लवकरात लवकर मुंबईतील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी भाजपा शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात यावेळी नगरसेविका उज्वला मोडक, नगरसेवक अभिजित सामंत, कमलेश यादव, हरिष भांदिर्गे आदी माजी नगरसेवक उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.