Babarao Savarkar : बंधुप्रेम

बाबांनी अनंत यातना, छळ सोसला तो मातृभूमीच्या उद्धारासाठी, आपला देह तीळ तीळ झिजवला तो आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी. आपण स्वातंत्र्य मिळवलंदेखील पण ते पाहण्याचं भाग्य मात्र बाबांच्या ललाटी नव्हतं.

198
Babarao Savarkar : बंधुप्रेम
मंजिरी मराठे

गणेश दामोदर उपाख्य (Babarao Savarkar) बाबाराव, विनायक दामोदर उपाख्य तात्याराव आणि डॉ. नारायण दामोदर उपाख्य बाळ सावरकर या त्रिवर्ग सावरकर बंधूंचं एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर या झंझावातापुढे बाबाराव आणि बाळ सावरकर या बंधूंचं कार्य काहीसं झाकोळलं गेलं. आपले दोन्ही बंधू अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना बाळाराव डॉक्टर झाले, आपल्या कुटुंबाचा आधार झाले. अनेक क्रांतिकारकांना त्यांनी सहकार्य केलं. कारावास, झडती, जप्ती याला सामोरे गेले. आपल्या दोन्ही भावांच्या भेटीसाठी, मुक्ततेसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

(हेही वाचा – Veer Savarkar : शिवाजी पार्क सभेत बोला; पण वीर सावरकरांचा अवमान कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही; मनसेचा राहुल गांधींना इशारा)

आपले बंधू विनायक यांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाची दोघा भावांना जाण होती. आपला भाऊ तात्या हा विलक्षण आहे, त्याच्या हातून काही भव्य, दिव्य घडणार आहे हा बाबांचा विश्वास होता. त्यामुळे अकाली साऱ्या कुटुंबाची जबाबदारी अंगावर कोसळल्यावर बाबारावांनी आपल्या पत्नीच्या येसूच्या जोडीनं तात्यांच्या आणि सर्वात लहान भाऊ बाळच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपलं (Babarao Savarkar) शिक्षण, आपल्या वैयक्तिक आशा आकांक्षांना तिलांजली दिली. योगविद्येत समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्याइतकी प्रगती होऊनही विवेकानंदांच्या आश्रमात जाण्याची आपली इच्छा मारून टाकली.

वीर सावरकरांनी सुरु केलेल्या क्रांतिकार्यात सुरुवातीला बाबारावांचा सहभाग नव्हता पण आपला हा भाऊ बॅरिस्टर होण्याच्या निमित्तानं पण क्रांतिकार्याचा हेतू मनात ठेऊन लंडनला गेल्यावर ‘अभिनव भारत’ या क्रांतियज्ञात त्यांनी (Babarao Savarkar) उडी घेतली इतकेच नव्हे तर आपल्या भावापूर्वीच काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी ते अंदमानाची वाट चालू लागले. त्याबाबत तात्या लिहितात, या देशवीराने सर्वांच्या आधी अंदमानातील जन्मठेपेच्या भयंकर शिक्षेला मेरुसारख्या अचल धैर्याने तोंड दिले.

(हेही वाचा – Babarao Savarkar : अलौकिक व्यक्तिमत्त्व!)

अंदमानात त्यांनी अनंत हालअपेष्टा सोसल्या, प्रकृती सतत परीक्षा घेत असताना अकरा वर्ष योगसामर्थ्यामुळे ते परिस्थितीशी लढत राहिले. आपण अंदमानात अडकलो असलो तरी आपला भाऊ देशस्वातंत्र्यार्थ झटतो आहे या समाधानात ते साऱ्या यमयातना भोगत होते. बाबांच्या (Babarao Savarkar) नंतर वर्षभरानं वीर सावरकरही ५० वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानात पोहोचले. अर्थात बाबांना याची कल्पनाही नव्हती. तात्यांनाही बाबांसमोर जाण्याचं धाडस होत नव्हतं. पण भावाच्या भेटीसाठी जीवही तळमळत होता. अखेर दोघा भावांची भेट झाली. आपल्या कर्तृत्ववान भावाला अंदमानच्या काळकोठडीत पाहून बाबांना अतोनात दु:ख झालं. एकमेकांना गुप्तपणे पाठवलेल्या चिठ्ठीत दोघांनी आपलं मन हलकं केलं.

सारथी जिचा अभिमानी, कृष्णजी आणि राम सेनानी
अशी तीस कोटी तव सेना ती आम्हाविना थांबेना.
या सावरकरांच्या शब्दांनी बाबांचं कासावीस मन तर शांत झालंच. पण तात्यांनाही त्यांच्याच शब्दांनी त्यांचं डळमळणारं धैर्य जाऊन नवा उत्साह मिळाला.

(हेही वाचा – Veer Savarkar : ‘वीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या कानाखाली खेचेन’, वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता रणदीप हुड्डाने दिले सडेतोड उत्तर)

२ मे १९२१ ला अंदमानातून दोघा भावांची मुक्तता झाली आणि काही काळासाठी दोघांची ताटातूट झाली. १९२२ मध्ये आसन्नमरण अवस्थेत असलेल्या बाबारावांना ब्रिटिशांनी नाईलाजानं मुक्त केलं. प्रकृती ढासळलेली असतानाही हिंदुहिताच्या रक्षणासाठी बाबाराव हिंदूमहासभेमध्ये सक्रिय झाले. १९२४मध्ये तात्यारावांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आल्यावर १५ दिवसात बाबांनी तिथे रत्नागिरी हिंदुमहासभेची स्थापना केली. पुढेही तिन्ही भावांचं एकमेकांच्या साहचर्यानं आणि स्वतंत्र कार्यही सुरु राहिलं. (Babarao Savarkar)

हिंदू तरुणांना संघटित करण्यासाठी १९२३-२४ मध्ये बाबांनी तरुण हिंदू सभेची स्थापना केली. ठिकठिकाणी जाऊन (Babarao Savarkar) बाबा तरुणांशी सतत संवाद साधत असत. त्यांच्या नागपूर भेटीत भेटले केशव बळीराम हेडगेवार. हेडगेवार यांनी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तरुण हिंदुसभा आणि संघ जोडीनं वाढत होते. अथक प्रवास करत बाबांनी तरुण हिंदुसभेच्या पंचवीस ते तीस शाखा स्थापन केल्या. धाकटा भाऊ बाळला अध्यक्षपद देऊन बाबा पडद्यामागे राहून काम करत होते. जिथे तरुण हिंदुसभेची शाखा असेल तिथे संघाची शाखा स्थापन करायची नाही आणि जिथे संघाची शाखा आहे तिथे तरुण हिंदुसभेची शाखा स्थापन करायची नाही हे पथ्य हेडगेवार आणि बाबा पाळत होते. पुढे १९३१मध्ये मात्र बाबांनी मोठ्या विश्वासानं तरुण हिंदुसभा केशव बळीराम हेडगेवार यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विलीन केली आणि संघाच्या वाढीसाठी अपार कष्ट घेतले. घरोघरी जाऊन संघासाठी निधी जमा केला. संघाचा विजीगिषू ध्वज निर्माण केला. (Babarao Savarkar)

(हेही वाचा – Babarao Savarkar : क्रांतिकारकांच्या प्राणाचे ‘प्राण’ : बाबाराव सावरकर)

हिंदू राष्ट्रार्थ भारतभर दौरे, बैठका, परिषदा घेत राहिले. क्रांतिकारकांच्या संपर्कात राहिले, त्यांचे प्रेरणास्रोत ठरले. देश विघातक गांधी अमानुल्ला करारासारख्या अनेक विषयांवर ते लोकांना सजग करत राहिले. पूर्वी लेखणी हाती न घेतलेल्या बाबांनी साहित्य निर्मिती केली तीही राष्ट्रहितार्थ. (Babarao Savarkar)

बाबांनी (Babarao Savarkar) अनंत यातना, छळ सोसला तो मातृभूमीच्या उद्धारासाठी, आपला देह तीळ तीळ झिजवला तो आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी. आपण स्वातंत्र्य मिळवलंदेखील पण ते पाहण्याचं भाग्य मात्र बाबांच्या ललाटी नव्हतं.

बाबांनी (Babarao Savarkar) आपले शेवटचे दिवस सांगलीत व्यतित केले. बाळाराव सावरकर, त्यांच्या पत्नी शांताबाई आणि सांगलीकरांनी बाबांची सेवा केली. जराजर्जर झालेला बाबांचा देह पंचत्वात विलीन झाला तो दिवस होता, १६ मार्च १९४५. दोनच दिवस आधी त्यांना स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवण्यात आलं. सावरकर लिहितात, आपल्यासारख्या सतत साठ वर्षे लढत असलेल्या वीराची काया जी पडेल ती मानवी काया नव्हे तर देवांच्या हातच्या वज्राची एक महान दिव्य समिधाच होय!… आता मृत्यू आला नाही तर आपण होऊन महाप्रस्थानाला निघायची घडी भरली… यास्तव, त्या अनंतात हे कर्मवीरा पूर्ण समाधानाने विलीन व्हावे….

(हेही वाचा – Babarao Savarkar : अलौकिक व्यक्तिमत्त्व!)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे जेष्ठ बंधूंना सुचवलं तेच २१ वर्षांनी स्वत:देखील आचरणात आणलं. मृत्यूला बोलावणं धाडलं… आणि धन्योSहं धन्योSहं म्हणत तेही अनंतात विलीन झाले…

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.