Babarao Savarkar : नावाप्रमाणेच ‘बाबा’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरुवातीच्या जडणघडणीत बाबाराव सावरकरांचा मोठा वाटा होता. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, काशिनाथपंथ लिमये असे नेते बाबारावांना येऊन भेटत. त्यांचा अनेक क्रांतिकारकांशी संपर्क होता. त्यांना येणा-या सर्व पत्रांची उत्तरे देण्यासाठी ते आग्रही असत. सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते.

84
Babarao Savarkar : नावाप्रमाणेच ‘बाबा’
जयेश शत्रुघ्न मेस्त्री

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू गणेश सावरकर म्हणजेच बाबाराव सावरकर (Babarao Savarkar) यांच्या चरित्राचा फारसा प्रचार झाला नसला तरी सावरकरवादी जनतेला बाबाराव ठाऊक आहेत. इतकेच काय तर आम्हा सर्व सावरकर भक्तांना सबंध सावरकर कुटुंबाबद्दल नितांत आदर आहे. आज सावरकरांचे वंशज किमान महाराष्ट्राच्या राजकारणात तरी उच्च पदावर हवे होते. असो.

(हेही वाचा – Veer Savarkar आणि Bhagojisheth Keer यांचा स्वातंत्र्यलढा एका समाजासाठी नव्हता तर देशासाठी – राहुल शेवाळे)

बाबाराव सावरकर (Babarao Savarkar) शिस्तप्रिय होते. प्रत्येक गोष्ट त्यांना जागच्या जागी लागायची. कोणतीही गोष्ट अंधारातही सापडायला हवी असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचा पेहराव मध्यमवर्गीय होता. स्वच्छता आणि नीटनेटकेपणाचे ते भोक्ते होते. एकदा बाळासाहेब ठाकरे भाषणात बाबारावांचा उल्लेख करताना म्हणाले होते की बाबाराव नाकाने पाणी प्यायचे. तर कोठा साफ होण्यासाठी रोज सकाळी ते नाकाने तांब्याभर पाणी प्यायचे. शारीरिक स्वच्छतेसह ते मानसिक स्वच्छतेवरही भर द्यायचे. त्यांच्याजवळ अर्जूनाला उपदेश करतानाचा भगवान कृष्णाचा फोटो होता. झोपण्यापूर्वी ते नेहमी कृष्णाचं स्मरण करायचे. ते धार्मिक होते. सण, उपवास, व्रत सर्व रुढीपरंपरेनुसार ते करायचे. आपल्या मुलांचे व्रतबंधही त्यांनी केले होते. तसेच ते कधी कधी एकटेच पेटीवर भजने वाजवत बसायचे.

(हेही वाचा – Veer Savarkar : राहुल गांधी यांच्याविरोधातील दाखल दाव्यात दिरंगाई केल्याने विश्रामबाग पोलिसांना कारणे दाखवा नोटीस)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरुवातीच्या जडणघडणीत बाबाराव सावरकरांचा (Babarao Savarkar) मोठा वाटा होता. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, काशिनाथपंथ लिमये असे नेते बाबारावांना येऊन भेटत. त्यांचा अनेक क्रांतिकारकांशी संपर्क होता. त्यांना येणा-या सर्व पत्रांची उत्तरे देण्यासाठी ते आग्रही असत. सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. अगदी कुणी रस्त्यावरुन गात-पेटी वाजवत जात असेल तर बाबाराव त्यांना बोलवून त्यांच्याकडून भक्तिगीते म्हणवून घ्यायचे आणि त्यांना बिदागी द्यायचे. त्यांना घरात वर्दळ आवडायची. ते सर्वांसोबत जेवायला बसायचे. मुलांना गोळा करुन संध्याकाळी गोष्टी सांगायचे. ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टींमधून मुलांवर संस्कार झाले पाहिजेत. अगदी कुटुंबासोबत आणि बाहेरच्या लोकांसोबतही ते मिळून मिसळून राहायचे.

(हेही वाचा – Babarao Savarkar : क्रांतिकारकांच्या प्राणाचे ‘प्राण’ : बाबाराव सावरकर)

सावरकरांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा बाबाराव (Babarao Savarkar) दोन्ही बंधूंचे खऱ्या अर्थाने ‘बाबा’ झाले. दोघांच्याही शिक्षणाची आणि सर्व कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. बाबांनी वडिलांप्रमाणे सर्वांचा सांभाळ केला. क्रांतिकार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र गांधी-नेहरु कुटुंबाची पुंगी वाजवणा-यांच्या गर्दीत भारतीय जनतेचे बाबारावांकडे लक्ष गेले नाही. हळूहळू काळ बदलत चालला आहे. आताचं युग हे सावरकर युग आहे. देश सावरकरांच्या तत्वांनुसार चालतोय. त्यामुळे हिंदुत्ववादी लेखकांनी सावरकर कुटुंबाचा इतिहास विविध मार्गांनी (साहित्य, नाटके, सिनेमे इत्यादी) लोकांसमोर आणण्यासाठी आता लेखणीला धार द्यायला हवी. बाबाराव सावरकर यांनी सर्वांना प्रेम दिलं, माया लावली आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी देशकार्य आणि सामाजिक कार्यातही भाग घेतला. बाबाराव नावाप्रमाणेच ‘बाबा’ होते, असेच म्हणायला हवे. (Babarao Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.