Ayodhya Railway Station : अयोध्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर कसे पोहोचाल?

स्टेशनपासून सर्वात जवळचे विमानतळ अयोध्या इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. २०१९ पासून, ट्रॅकचे विद्युतीकरण करून तसेच दुहेरी रेल्वे मार्ग जोडून स्टेशनचा विस्तार केला जात आहे.

93
Ayodhya Railway Station : अयोध्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर कसे पोहोचाल?

अयोध्या जंक्शन रेल्वे स्टेशन हे अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जातो. हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या (Ayodhya) शहरातील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक धर्मकाटा येथे स्थित आहे. शहरापासून १.५ किमी (०.९३ मैल) दक्षिण-पश्चिम आणि राम मंदिरापासून १.२ किमी (०.७५ मैल) आग्नेय दिशेला आहे. अयोध्या धाम जंक्शन आणि फैजाबाद जंक्शन असे दोन महत्वाचे जंक्शन आहेत. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रांतर्गत येते. (Ayodhya Railway Station)

या रेल्वे स्थानकाचा स्टेशन कोड “AY” आहे. सध्या सुरू असलेल्या आधुनिकीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून या स्टेशनकडे शहरातून तसेच एनएच-२७ वरून अयोध्या बायपास रोडवरुन पोहोचता येते. हे स्थानक अयोध्या (Ayodhya) धाम बस स्थानकाशी जोडलेले आहे. तेथून ६ किमी पूर्वेला, आणि फैजाबाद बस डेपोपर्यंत, अयोध्येपासून १५ किमी पश्चिमेला स्थित आहे. (Ayodhya Railway Station)

(हेही वाचा – Gudi Padwa 2024 : देशभरात ३३८ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन; मंदिर स्वच्छता व सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण)

नवीन बांधकाम दोन टप्प्यात

स्टेशनपासून सर्वात जवळचे विमानतळ अयोध्या इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. २०१९ पासून, ट्रॅकचे विद्युतीकरण करून तसेच दुहेरी रेल्वे मार्ग जोडून स्टेशनचा विस्तार केला जात आहे. नवीन डिझाइन हे सध्याच्या स्थानकाच्या मंदिरासारखेच राहणार आहे आणि अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या बांधकामामुळे अपेक्षित जास्त प्रवासी संख्या सामावण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे व नवीन सुविधा देखील निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्टेशनला येता तेव्हा मंदिरात आल्याचा भाव निर्माण होतो. (Ayodhya Railway Station)

नवीन बांधकाम दोन टप्प्यात आहे, पहिल्या टप्प्यासाठी १३१.९७ कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ३०७ कोटी रुपये खर्च आला आहे. पहिल्या टप्प्यात अधिक स्वच्छतागृहे, विश्रामगृहे, वसतिगृह आणि तिकीट कार्यालये यांसारख्या सुविधांसह नवीन स्टेशन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात प्लॅटफॉर्म विकसित केले जाणार आहेत. (Ayodhya Railway Station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.